24.9 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

‘समन्वयसमिती’ गठीत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या निवृत्ती वेतन धारक प्रतिनिधीनिंना एकत्र यायचे आवाहन.

- Advertisement -
- Advertisement -

उद्या १५ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता ओरोस येथे एकत्रीत व्हायचे आवाहन.

श्रावण | गणेश चव्हाण : कोकणातील गणेश उत्सवा सारख्या महत्वाच्या सणाकरीता निवृत्ती वेतन धारकांना निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणेसाठी शासनाने आदेश काढूनही गणेश उत्सवाला प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निवृत्तीवेतनाचा लाभ वेळीच मिळू शकलेला नाही. त्यामुळे शासनाचे निवृत्त कर्मचारी नाराज आहेत.

सेवानिवृत्ती धारकांच्या विविध समस्यांचे वेळीच निवारण होण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्रित लढा देणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद सेवा निवृत्तीवेतन धारकाच्या विविध संवर्गातील विविध संघटना आहेत. प्रत्येक संघटना आपापल्यापरीने काम करीत आहेत. तरीसुद्धा जि.प. किंवा पं.स. प्रशासन दाद देत नाही . निवृत्ती वेतन धारकांच्या समस्या वर्षानुवर्षे तशाच पडून आहेत. यासाठी वारंवार तालुका व जिल्हा अदालती तही समस्या मांडून उपयोग होत नाही.

त्याकरिता सर्व संघटनांची मिळून जिल्हास्तरावर एक ‘समन्वयसमिती’ गठीत करणे गरजेचे आहे. याच उद्देशाने शनिवारी १५ ऑक्टोबरला सकाळी १० वा. प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था कार्यालय, सिंधुदुर्ग नगरी- ओरोस या ठिकाणी सर्व सेवानिवृत्त निवृत्तीवेतन धारकाच्या संघटना प्रतिनिधींची सभा आयोजित करण्यात आलेली आहे.
सर्वानी या सभेला वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, प्रकाश राणे, रावजी यादव, रविकांत मुसळे, बाबली वायंगणकर, चंद्रकांत पाटकर, राजश रेगे, हनुमंत प्रभू यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

उद्या १५ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता ओरोस येथे एकत्रीत व्हायचे आवाहन.

श्रावण | गणेश चव्हाण : कोकणातील गणेश उत्सवा सारख्या महत्वाच्या सणाकरीता निवृत्ती वेतन धारकांना निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणेसाठी शासनाने आदेश काढूनही गणेश उत्सवाला प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निवृत्तीवेतनाचा लाभ वेळीच मिळू शकलेला नाही. त्यामुळे शासनाचे निवृत्त कर्मचारी नाराज आहेत.

सेवानिवृत्ती धारकांच्या विविध समस्यांचे वेळीच निवारण होण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्रित लढा देणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद सेवा निवृत्तीवेतन धारकाच्या विविध संवर्गातील विविध संघटना आहेत. प्रत्येक संघटना आपापल्यापरीने काम करीत आहेत. तरीसुद्धा जि.प. किंवा पं.स. प्रशासन दाद देत नाही . निवृत्ती वेतन धारकांच्या समस्या वर्षानुवर्षे तशाच पडून आहेत. यासाठी वारंवार तालुका व जिल्हा अदालती तही समस्या मांडून उपयोग होत नाही.

त्याकरिता सर्व संघटनांची मिळून जिल्हास्तरावर एक 'समन्वयसमिती' गठीत करणे गरजेचे आहे. याच उद्देशाने शनिवारी १५ ऑक्टोबरला सकाळी १० वा. प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था कार्यालय, सिंधुदुर्ग नगरी- ओरोस या ठिकाणी सर्व सेवानिवृत्त निवृत्तीवेतन धारकाच्या संघटना प्रतिनिधींची सभा आयोजित करण्यात आलेली आहे.
सर्वानी या सभेला वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, प्रकाश राणे, रावजी यादव, रविकांत मुसळे, बाबली वायंगणकर, चंद्रकांत पाटकर, राजश रेगे, हनुमंत प्रभू यांनी केले आहे.

error: Content is protected !!