वैभववाडी | नवलराज काळे : परतीच्या पावसातील विजांच्या कडकडाटात अंगावर विजेचा लोळ कोसळल्यामुळे सांगेली-गुरगुटवाडी येथील एका व्यक्तिचा अंत झाला. ही घटना आज पहाटे ०५:३० च्या दरम्यान घडली. श्री. हनुमंत नाना झोरे (वय २९) असे त्यांचे नाव आहे.
ते सकाळी उठून लघुशंकेसाठी गेला असताना ही घटना घडली असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
परतीच्या पावसात पडलेल्या विजेत ही दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली. अधिक माहिती अशी की, या भागात आज पहाटेपासूनच विजेच्या कडकडासह पाऊस सुरू झाला होता. श्री. झोरे लघुशंकेसाठी घराच्या अंगणात गेला असता अचानक त्याच्या अंगावर विजेचा लोळ पडून तो जागेच खाली पडला. तो घरात पुन्हा परतला नाही. म्हणून त्यांच्या घरातील कुटुंबीयांनी बाहेर येऊन पाहतात तर ते अंगणात विजेचा लोळ पडून निपचीत होते. त्यानंतर गावातील व्यक्तींनी याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद व त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ते अविवाहित होते. शेतीची कामे व मेंढ्या पालन हा त्यांचा व्यवसाय होता. सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनीही या कुटुंबाचे विचारपूस केली आहे.
भं
भावपूर्ण श्रद्धांजली