29.4 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

श्रावण गांवच्या ‘संचय संस्कारांची जननी’..सौ. वैशाली वासुदेव परब. (वाढदिवस विशेष )

- Advertisement -
- Advertisement -

कोणालाच न दुखवता जगणे, याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही हे ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज नसते : सौ.वैशाली परब.

श्रावण | गणेश चव्हाण (विशेष) : समाजाचे हित फक्त तोच करतो की ज्याला ज्ञान, दया माया, भक्ती यांचा अभ्यास असतो. अशा व्यक्ती कायम इतरांचाच विचार करतात. सतत समाजाच्या उपयोगी पडल्याने एक समाधान मिळते. अंगात ऊर्जा निर्माण होऊन नकळत आरोग्य सुख मिळते.
हे आणि असे निर्मळ अध्यात्मिक सुख प्राप्त केलेले, शांत, संयमी सुशिक्षीत, गोरगरीबांसाठी व समाज विकासासाठी झटणारे व तरिही प्रसिध्दी पासुन दूर राहिलेले एक व्यक्तिमत्व म्हणजे श्रावण गांवच्या अंगणवाडी सेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैशाली वसुदेव परब.
सौ.वैशाली परब यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे.

महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास विभागाच्या श्रावण परबवाडी अंगणवाडी सेविका म्हणून पदावर उत्कृष्ट प्रमाणे आदर्श काम करणाऱ्या सौ. वैशाली वासुदेव परब यांनी आपल्या शिशु वर्गाचे संगोपन अतिशय काळजीपूर्वक करत शासनाचे अनेक वेळा मानांकन मिळवले आहे. शासन व समाजा कडुन अनेक वेळा आपल्या अंगणवाडी मुलांचीही त्यांनी त्यांच्या सृजनशीलतेमुळे ओळख करुन दिली व त्यांची प्रशंसा झाली.
हे सर्व करत असताना आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या भक्तीमार्गातील सौ.परब मॅडम यांची मुलेअमित व मिथुन पदवीधर असुन मुंबईत चांगल्या हुद्यावर नोकरी करू शकले हे विशेष…!
मुलगी सौ. मयुरी हिचाही संसार त्यांनी संस्कारक्षम करुन दिला.
पती वासुदेव परब हे सुद्धा मुख्याध्यापक पदावर सेवानिवृत्त होऊन, समाज कार्यात आहेत. सुसंस्कृत सुना, नातवंडे या कुटुंबाच्या प्रेमळ सहकार्यामुळेच ही जन सेवा करतात.
अशा या समाजसेवा वृत्तीमुळेच परमेश्वरांचा वरदहस्त त्यांच्या पाठीशी सदैव आहे. आपली नोकरी सांभाळून, कुटुंब सांभाळून गावातील महिलांचे भलं करण्याचा शोधक विचार सतत त्यांच्या मनात असतो. शोधक प्रवृत्तीच्या सौ. वैशाली परब ऊर्फ नानी आपल्या दैनंदिन जिवनात कधीच शांत राहिल्या नाहीत. सतत गावातील महिलांचा विचार. गरीब महिलांना बचतीची सवय लागावी व त्यांच्या संसारात हातभार लागावा म्हणुन ४२वर्ष अर्थसंचय फंड सुरु केला.
शासन निर्णयाप्रमाणे बचत गटांच्या माध्यमांतून महिलांना काय मिळवून देता येईल. सामाजिक उपक्रमांतून शिकता शिकता या गरीब महिलांचा आर्थिक विकासाबरोबर बौध्दीक विकास कसा करता येईल. याचे अभ्यासपूर्वक नियोजन करुन महिलांना पुढे आणले. ‘महालक्ष्मी सरस व सिंधुसरस’ या कंपन्यांकडुन मालवण तालुक्यात श्रावण बचतगटाचा पहिला नंबर मिळवला. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गावातील अनेक महिलांचा आत्मविश्वास वाढवुन अनेक जणांना व्यासपिठ दाखवले. गणेश चतुर्थी, नवरात्रौत्सव, शारदोत्सव, हरीनाम सप्ताह, शिवरात्रौत्सव, हनुमान जयंती, शिवजयंती तसेच गावातील वार्षीक व शासकीय कार्यक्रमात सर्व महिलांना सोबत घेऊन, हिरिरीने अग्रक्रमाने सहभाग घेतात. फुगडी, महिलांचे भजन, नाटक, नाच, गाणी पाककला आदी सांस्कृतिक व लोककला कार्यक्रमाद्वारे सौ. वैशाली नानीने निस्वार्थपणे श्रावण गावांतीलच नव्हे तर पंचक्रोषीतील महिलांचे मनोधैर्य वाढवले. अशा या सदानंदी, हसमुख, चातुर्यशील, शिलवान, गुणवान रणराघीणीला आजच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त अखंड शुभेच्छा .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कोणालाच न दुखवता जगणे, याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही हे ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज नसते : सौ.वैशाली परब.

श्रावण | गणेश चव्हाण (विशेष) : समाजाचे हित फक्त तोच करतो की ज्याला ज्ञान, दया माया, भक्ती यांचा अभ्यास असतो. अशा व्यक्ती कायम इतरांचाच विचार करतात. सतत समाजाच्या उपयोगी पडल्याने एक समाधान मिळते. अंगात ऊर्जा निर्माण होऊन नकळत आरोग्य सुख मिळते.
हे आणि असे निर्मळ अध्यात्मिक सुख प्राप्त केलेले, शांत, संयमी सुशिक्षीत, गोरगरीबांसाठी व समाज विकासासाठी झटणारे व तरिही प्रसिध्दी पासुन दूर राहिलेले एक व्यक्तिमत्व म्हणजे श्रावण गांवच्या अंगणवाडी सेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैशाली वसुदेव परब.
सौ.वैशाली परब यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे.

महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास विभागाच्या श्रावण परबवाडी अंगणवाडी सेविका म्हणून पदावर उत्कृष्ट प्रमाणे आदर्श काम करणाऱ्या सौ. वैशाली वासुदेव परब यांनी आपल्या शिशु वर्गाचे संगोपन अतिशय काळजीपूर्वक करत शासनाचे अनेक वेळा मानांकन मिळवले आहे. शासन व समाजा कडुन अनेक वेळा आपल्या अंगणवाडी मुलांचीही त्यांनी त्यांच्या सृजनशीलतेमुळे ओळख करुन दिली व त्यांची प्रशंसा झाली.
हे सर्व करत असताना आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या भक्तीमार्गातील सौ.परब मॅडम यांची मुलेअमित व मिथुन पदवीधर असुन मुंबईत चांगल्या हुद्यावर नोकरी करू शकले हे विशेष…!
मुलगी सौ. मयुरी हिचाही संसार त्यांनी संस्कारक्षम करुन दिला.
पती वासुदेव परब हे सुद्धा मुख्याध्यापक पदावर सेवानिवृत्त होऊन, समाज कार्यात आहेत. सुसंस्कृत सुना, नातवंडे या कुटुंबाच्या प्रेमळ सहकार्यामुळेच ही जन सेवा करतात.
अशा या समाजसेवा वृत्तीमुळेच परमेश्वरांचा वरदहस्त त्यांच्या पाठीशी सदैव आहे. आपली नोकरी सांभाळून, कुटुंब सांभाळून गावातील महिलांचे भलं करण्याचा शोधक विचार सतत त्यांच्या मनात असतो. शोधक प्रवृत्तीच्या सौ. वैशाली परब ऊर्फ नानी आपल्या दैनंदिन जिवनात कधीच शांत राहिल्या नाहीत. सतत गावातील महिलांचा विचार. गरीब महिलांना बचतीची सवय लागावी व त्यांच्या संसारात हातभार लागावा म्हणुन ४२वर्ष अर्थसंचय फंड सुरु केला.
शासन निर्णयाप्रमाणे बचत गटांच्या माध्यमांतून महिलांना काय मिळवून देता येईल. सामाजिक उपक्रमांतून शिकता शिकता या गरीब महिलांचा आर्थिक विकासाबरोबर बौध्दीक विकास कसा करता येईल. याचे अभ्यासपूर्वक नियोजन करुन महिलांना पुढे आणले. 'महालक्ष्मी सरस व सिंधुसरस' या कंपन्यांकडुन मालवण तालुक्यात श्रावण बचतगटाचा पहिला नंबर मिळवला. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गावातील अनेक महिलांचा आत्मविश्वास वाढवुन अनेक जणांना व्यासपिठ दाखवले. गणेश चतुर्थी, नवरात्रौत्सव, शारदोत्सव, हरीनाम सप्ताह, शिवरात्रौत्सव, हनुमान जयंती, शिवजयंती तसेच गावातील वार्षीक व शासकीय कार्यक्रमात सर्व महिलांना सोबत घेऊन, हिरिरीने अग्रक्रमाने सहभाग घेतात. फुगडी, महिलांचे भजन, नाटक, नाच, गाणी पाककला आदी सांस्कृतिक व लोककला कार्यक्रमाद्वारे सौ. वैशाली नानीने निस्वार्थपणे श्रावण गावांतीलच नव्हे तर पंचक्रोषीतील महिलांचे मनोधैर्य वाढवले. अशा या सदानंदी, हसमुख, चातुर्यशील, शिलवान, गुणवान रणराघीणीला आजच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त अखंड शुभेच्छा .

error: Content is protected !!