मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा नोबेल कंप्यूटर सेल्स ॲन्ड सर्विसेसच्या अद्ययायवत खरेदी विक्री दालनाचा आज शुभारंभ झाला.
मालवण शहरचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व सौ. स्मृती महेश कांदळगांवकर , कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, मालवणचे ज्येष्ठ व्यापारी नितीन तायशेट्ये, रोटरी क्लबचे डाॅ. अजित लिमये व डाॅ. लीना लिमये ,डाॅ. रामचंद्र चव्हाण व त्यांच्या पत्नी , एल.आय.सी.चे अधिकारी श्री.शैलेश पावसकर तसेच शहरातील अनेक प्रतिष्ठीत व्यापारी, समाजशील व्यक्ती, युवा विद्यार्थी विद्यार्थिनी वर्ग व नागरिकांनी या दालनाला भेट दिली.
यावेळी नोबल काॅम्प्युटर सेल्स ॲन्ड सर्विसेसचे प्रोप्रायटर श्री प्रणय तेली व सौ.सई तेली यांच्यासह टीम नोबलच्या कु. बावकर , श्री. मिठबांवकर व इतर सहकारी उपस्थित होते.
प्रोप्रायटर श्री प्रणय तेली यांनी सर्वांना दालनातील आधुनीक डिजीटल उपकरणे व त्यांची वैशिष्ट्ये समजावून सांगितली.
आजच या उपकरणांच्या विक्रीचा शुभारंभ झाला आहे.
आता मालवण वासियांना वाजवी किंमतीत लॅपटॉप,डेस्क टाॅप प्रिंटर्स सह अनेक डिजीटल इलेक्ट्रॉनिक एक्ससरीज एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
नोबेल कंप्यूटर सेल्स ॲन्ड सर्विसेसने ग्राहकांच्या सुविधेसाठी शून्य डाऊन पेमेंट व इतर सुलभ फायनान्सची सोय आणि विक्री पश्चात सेवेसाठी सुद्धा या दालनात सुविधा उपलब्ध केलेली आहे.
सि सी टि व्ही, कराओके स्पीकर्स व सर्व अत्याधुनिक डिजीटल उपकरणांची सर्व श्रेणीतील उत्पादने या दालनामध्ये उपलब्ध असणार आहेत.
विविध ऑफर्स आणि ऑनलाईन खरेदीपेक्षाही विश्वासार्हता व वाजवी दर असे हे आपले सर्वसामान्य लोकांचे दालन आहे असे याप्रसंगी नोबल काॅम्प्युटर सेल्स ॲन्ड सर्विसेसचे प्रोप्रायटर श्री.प्रणय तेली व सौ.सई तेली यांनी स्पष्ट केले आहे.
मालवणातील वाघ पिंपळ समोरील सिताई काॅम्प्लेक्स मधील व्यावसायिक गाळ्यामध्ये तळमजल्यालाच या दालनाची सुविधा उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ९४२२४३५०९५, ७०५८१९०६१४ व ९४०३५९३९४० या क्रमांकांवर संपर्क साधून चौकशी व माहिती मिळू शकणार आहे. नोबल कंम्प्युटरने मालवण शहरातील संगणक प्रशिक्षण क्षेत्रात गेली दोन दशके सेवा बजावलेली आहे.