विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पहिलीच हृदय प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया खासगी हॉस्पिटलमध्ये यशस्वी झाली आहे. कुडाळ मधील भिकाजी निर्गुण यांची हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ठाणे जिल्ह्यातील जुपिटर हॉस्पिटल मध्ये माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांच्या मदतीने यशस्वी करण्यात आली.
त्या शस्त्रक्रियेचा एकूण खर्च ४० लाख रुपये सांगण्यात आला होता परंतु निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे ते २० लाखात करून देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
डाॅ. निलेश राणेच्या सांगण्यावरून या कामाचा पाठपुरावा राणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सलमान गांगु आणि शेखर राणे तसेच वैद्यकीय कोकण आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर अमोल देसाई सर यांनी केला होता असेही सूत्रांकडून समजते.