24.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

माजी खासदार निलेश राणे यांनी अज्ञान प्रकट करु नये : शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर.

- Advertisement -
- Advertisement -

मालवणातील आरसे महाल नूतनीकरण शंकेचा वाद.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या ‘आरसे महाल’ नूतनीकरण मुद्द्यावर शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी माजी खासदार निलेश राणे यांना सुनावले आहे.

तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या म्हणण्यानुसार व त्यांनी प्रसार माध्यमांना सादर केलेल्या पत्रानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातले शासकीय विश्रांतीगृह ‘आरसे महल’ नूतनीकरणाच्या कामाची मंजुरी व प्रशासकीय मान्यता महाविकास आघाडी सरकारच्याच्या काळात अर्थसंकल्पीय तरतूद (अर्थसंकल्प) २०२० मध्ये करण्यात आली होती.

दोन दिवसांपूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी आरसे महल नूतनीकरण कामाची पाहणी करून स्थानिक आमदार वैभव नाईक यांच्यावर टिका केली होती.
वास्तवीक या मालवण ‘आरसे महाल’ विश्रांतीगृह कामाला मंजुरी व प्रशासकीय मान्यता ‘शासन निर्णय क्रमांक – बीडीजी-२०२०/प्र. क्र. ५१/इमारती – ३, सार्वजनिक बांधकाम विभाग, दि. २७ फेब्रुवारी, २०२०’ अन्वये देण्यात आली होती असे प्रतिपादन तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.
शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद केले आहे की, दिनांक ०७ फेब्रुवारी २०२० च्या पत्रान्वये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील शासकीय विश्रामगृह इमारत दुरुस्ती व मजबुतीकरण करण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या कामाची निविदा प्रक्रिया १८ जानेवारी २०२२ रोजी केल्यानंतर मे. प्रभू इंजिनियर्स, पिंगुळी यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. हे बजेट २०२० अंतर्गत मंजूर कामाला प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश देण्याकरिता आमदार वैभव नाईक यांनी अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बजेट अंतर्गत मंजूर कामांपैकी पहिलेच काम प्रत्यक्षात सुरू देखील करण्यात आले आहे. या दरम्यानच्या काळात तत्कालीन महाविकास आघाडी सरकार च्या काळात च सर्व प्रकिया पूर्ण झाली आहे.
या कामाच्या मंजुरीसाठी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे शिफारस करून पाठपुरावा केल्यानंतर मार्च २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये तरतूद करून निधी मंजूर करून दिला होता. यामुळे माजी खासदार निलेश राणे यांनी उगीचच टिका करणे टाळून स्वतः चे अज्ञान प्रकट करू नये असे माजी जि. प.सदस्य व शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी माजी खासदार निलेश राणे यांना सुनावले आहे.
‘आरसे महाल’ नूतनीकरणाच्या श्रेयाचा हा विषय नसून आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा केलेल्या कामाचीच आपण माहिती देत आहोत असेही माजी जि.प.सदस्य व मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवणातील आरसे महाल नूतनीकरण शंकेचा वाद.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या 'आरसे महाल' नूतनीकरण मुद्द्यावर शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी माजी खासदार निलेश राणे यांना सुनावले आहे.

तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या म्हणण्यानुसार व त्यांनी प्रसार माध्यमांना सादर केलेल्या पत्रानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातले शासकीय विश्रांतीगृह 'आरसे महल' नूतनीकरणाच्या कामाची मंजुरी व प्रशासकीय मान्यता महाविकास आघाडी सरकारच्याच्या काळात अर्थसंकल्पीय तरतूद (अर्थसंकल्प) २०२० मध्ये करण्यात आली होती.

दोन दिवसांपूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी आरसे महल नूतनीकरण कामाची पाहणी करून स्थानिक आमदार वैभव नाईक यांच्यावर टिका केली होती.
वास्तवीक या मालवण 'आरसे महाल' विश्रांतीगृह कामाला मंजुरी व प्रशासकीय मान्यता 'शासन निर्णय क्रमांक - बीडीजी-२०२०/प्र. क्र. ५१/इमारती - ३, सार्वजनिक बांधकाम विभाग, दि. २७ फेब्रुवारी, २०२०' अन्वये देण्यात आली होती असे प्रतिपादन तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.
शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद केले आहे की, दिनांक ०७ फेब्रुवारी २०२० च्या पत्रान्वये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील शासकीय विश्रामगृह इमारत दुरुस्ती व मजबुतीकरण करण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या कामाची निविदा प्रक्रिया १८ जानेवारी २०२२ रोजी केल्यानंतर मे. प्रभू इंजिनियर्स, पिंगुळी यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. हे बजेट २०२० अंतर्गत मंजूर कामाला प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश देण्याकरिता आमदार वैभव नाईक यांनी अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बजेट अंतर्गत मंजूर कामांपैकी पहिलेच काम प्रत्यक्षात सुरू देखील करण्यात आले आहे. या दरम्यानच्या काळात तत्कालीन महाविकास आघाडी सरकार च्या काळात च सर्व प्रकिया पूर्ण झाली आहे.
या कामाच्या मंजुरीसाठी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे शिफारस करून पाठपुरावा केल्यानंतर मार्च २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये तरतूद करून निधी मंजूर करून दिला होता. यामुळे माजी खासदार निलेश राणे यांनी उगीचच टिका करणे टाळून स्वतः चे अज्ञान प्रकट करू नये असे माजी जि. प.सदस्य व शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी माजी खासदार निलेश राणे यांना सुनावले आहे.
'आरसे महाल' नूतनीकरणाच्या श्रेयाचा हा विषय नसून आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा केलेल्या कामाचीच आपण माहिती देत आहोत असेही माजी जि.प.सदस्य व मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!