संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
श्री गायगोठण गणेश मंदिर चाफेड भोगलेवाडीच्यावतीने मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विजयादशमीच्या मुहूर्तावर खुल्या संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रोख ५००० रुपये, ३००० रुपये व २००० हजार रुपये तसेच प्रत्येकी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
सदरची भजन स्पर्धा दसऱ्या दिवशी बुधवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. या स्पर्धेत गायन करताना संत वाङ्मयावर आधारित अभंग, गवळण गायन करणे आवश्यक असेल. प्रत्येक भजन मंडळाला सादरीकरणासाठी ४० मिनिटे कालावधी दिला जाणार आहे. या स्पर्धेत किमान ११ व कमाल १५ मंडळ सहभागी करून घेण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी नावनोंदणीची अंतिम तारीख ३ ऑक्टोबर २०२२ अशी आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी विजय भोगले ९४२३३०३९३९, पंढरीनाथ कांडर, दिनकर घाडी यांच्याशी संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त मंडळांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री गायगोठण गणेश मंदिर देवस्थान समिती चाफेड, भोगलेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.