मुंबई | ब्युरो न्यूज : आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.
भाजपाचे रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त केले गेले आहेत. त्यांच्याकडे सध्या सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण ही खाती सुद्धा आहेत.