28.6 C
Mālvan
Tuesday, December 3, 2024
IMG-20240531-WA0007

मालवणात रात्री उशीरापर्यंत वीज पुरवठा सुरु होईल असे प्रयत्न ; कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहितेंनी दिले संकेत.

- Advertisement -
- Advertisement -

खारेपाटण येथील आगीवर मिळवले नियंत्रण.

मालवणसह देवगड, वैभववाडीतील मात्र वीजपुरवठा आहे ठप्प..!

कणकवली | ब्युरो न्यूज : आज दुपारी उशिरा ४ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या ‘खारेपाटण विद्युत पारेषणच्या’ सब स्टेशन मधील ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगी वर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. कणकवली नगरपंचायत आणि राजापूर नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने ही आग विझवली.
मात्र अजुनही मालवण, देवगड व वैभववाडी तालुक्यातील वीजपुरवठा ठप्प आहे.
रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर काम सुरू असल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिली.
गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास या ट्रांसफार्मरला लागलेली आग कणकवली नगरपंचायत च्या अग्निशमन बंबाने विजवण्यात आली. मात्र यामुळे खंडित झालेल्या वीजपुरवठ्यापैकी कणकवली तालुक्यातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर देवगड वैभववाडी व मालवण तालुक्यातील वीजपुरवठा खंडित आहे हा वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याच्या दृष्टीने महावितरण व महापारेषण चे कर्मचारी युद्ध पातळीवर कार्यरत आहेत रात्री उशिरापर्यंत हा वीजपुरवठा सुरू होईल यादृष्टीने सर्व प्रयत्न सुरू असल्याचे श्री मोहिते यांनी सांगितल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

खारेपाटण येथील आगीवर मिळवले नियंत्रण.

मालवणसह देवगड, वैभववाडीतील मात्र वीजपुरवठा आहे ठप्प..!

कणकवली | ब्युरो न्यूज : आज दुपारी उशिरा ४ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या 'खारेपाटण विद्युत पारेषणच्या' सब स्टेशन मधील ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगी वर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. कणकवली नगरपंचायत आणि राजापूर नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने ही आग विझवली.
मात्र अजुनही मालवण, देवगड व वैभववाडी तालुक्यातील वीजपुरवठा ठप्प आहे.
रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर काम सुरू असल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिली.
गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास या ट्रांसफार्मरला लागलेली आग कणकवली नगरपंचायत च्या अग्निशमन बंबाने विजवण्यात आली. मात्र यामुळे खंडित झालेल्या वीजपुरवठ्यापैकी कणकवली तालुक्यातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर देवगड वैभववाडी व मालवण तालुक्यातील वीजपुरवठा खंडित आहे हा वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याच्या दृष्टीने महावितरण व महापारेषण चे कर्मचारी युद्ध पातळीवर कार्यरत आहेत रात्री उशिरापर्यंत हा वीजपुरवठा सुरू होईल यादृष्टीने सर्व प्रयत्न सुरू असल्याचे श्री मोहिते यांनी सांगितल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

error: Content is protected !!