मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुणगे श्री भगवती देवालय येथील सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त १८ सप्टेंबर रोजी २०×२० तिरंगी भजनांचा जंगी सामना होणार आहे.
देवी भगवती मंदिरामध्ये एकवीस दिवसाचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरु असून त्यानिमित्ताने मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. सत्यनारायणाची महापुजा होणार असून त्यानिमित्ताने रात्री १० वाजता २०×२० तिरंगी भजनाचा जंगी सामना गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ ओरोसखुर्द,कोकणरत्न चंद्रकांत कदम यांचे शिष्य बुवा ज्ञानदेव मेस्त्री (पखवाज बंटी मेस्त्री व तबला भावेश मेस्त्री), विरुध्द दत्तगुरू प्रासादिक भजन मंडळ मुंबई- बांद्रा बुवा प्रमोद हर्यान यांचे शिष्य बुवा गणेश जांभळे (पखवाज प्रणय धुरी व तबला सुदर्प घागरे) विरुद्ध विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ आजिवली बुवा अजित मुळम यांचे शिष्य बुवा प्रवीण सुतार (पखवाज रितेश पांचाळ ,तबला प्रविण सुतार) यांच्यात तिरंगी भजनाचा जंगी सामना होणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजी दुपारी तीन नंतर श्री चे विसर्जन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन देवी भगवती देवस्थानचे अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन आणि सचिव निषाद परूळेकर यानी केले आहे.