छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान, कणकवली, व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली शिवसेना शाखा वरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत उपक्रम.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. धनंजय दिलीप सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान, कणकवली व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली शिवसेना शाखा वरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर बुधवार दिनांक २१ सप्टेंबर २०२२ सकाळी ९ ते दुपारी २.०० वाजेपर्यंत वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र, वरवडे, तालुका कणकवली येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदान शिबीरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे.
धनंजय सावंत : ९४०४९३६९४४, संदेश कडुलकर: ९६३७४३२२२३, अमेय मडव : ९६९९३२६०५७,
संतोष मेस्त्री : ७२१८५१८७१३, राजेश कोदे : ९४२२१३९६६९