27.2 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

वालावल गावांत ‘सेवा पंधरवडा’ निमित्त वस्ती संपर्क स्वच्छता अभियान.

- Advertisement -
- Advertisement -

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी ‘सेवा पंधरावडा’ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाबद्दल त्यांचे विचार मांडताना म्हणले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसाचा कुडाळ तालुक्यातील वालावल गावात एक दिवस अगोदर शुभारंभ होतोय यापेक्षा मोठा आनंद नाही. अनुसूचित जाती मोर्चा कुडाळ तालुका अध्यक्ष चंद्रकांत वालावलकर याच्या पुढाकाराने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवस संपर्क स्वच्छता अभियान राबवून करण्यात येत आहे. या सेवा पंधरावड्याचा शुभारंभ संपूर्ण जिल्ह्यात सर्वप्रथम नेरुर जिल्हा परिषद मतदार संघातील वालावल या गावात करण्यात आला याचा देखील खूप आनंद होत आहे.

तसेच या विभागात जिल्हा परिषद आणि पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात विकास कामे पूर्ण झाल्यामुळे वालावल समतानगर हे कायमच भारतीय जनता पक्षाच्या बाजूने राहीले आहे. म्हणून आम्ही सुध्दा जेव्हा जेव्हा समाज बांधव आम्हाला हाक मारतात तेव्हा त्यांच्या सोबत ठामपणे असतो. या समाजातील प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीचे नाते असल्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रत्येक कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा होत असतो असे गौरवोद्गार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.रणजीत देसाई काढले.

या कार्यक्रमात अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री चंद्रकांत जाधव यांनी पंतप्रधान सन्मा नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपर्क स्वच्छता अभियान साजरा करण्याबाबत मार्गदर्शन केले. अनुसूचित जाती व जमातींना केंद्र सरकारच्या ज्या विविध योजना आहेत त्याबद्दल माहिती दिली. जिल्हा उपाध्यक्ष अनंत आसोलकर, सरपंच निलेश साळसकर,माजी सरपंच राजेश प्रभु ,उपसरपंच संदेश मठकर, ग्रामपंचायत सदस्य दिपीका वालावलकर, कुडाळ तालुका मंडल अनुसूचित मोर्चा अध्यक्ष चंद्रकांत वालावलकर, मनीष वंजारी, कृष्णा , वालावलकर, जेष्ठ नागरिक विष्णू वालावलकर, समिर वालावलकर, चिन्मय वालावलकर, भूषण वालावलकर,राजेश वालावलकर,सुरज वालावलकर,सागर वालावलकर,बाळू वालावलकर,महेश वालावलकर, दिनेश वालावलकर,गितांजली वालावलकर, प्रज्ञा वालावलकर, राजश्री वालावलकर, अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर वालावल समता नगर मधील मुख्य रस्त्यालगत असलेली झाडी तोडून व गटाराची साफसफाई करून सेवा पंधरावड्याची सुरुवात करण्यात आली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी 'सेवा पंधरावडा' व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाबद्दल त्यांचे विचार मांडताना म्हणले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसाचा कुडाळ तालुक्यातील वालावल गावात एक दिवस अगोदर शुभारंभ होतोय यापेक्षा मोठा आनंद नाही. अनुसूचित जाती मोर्चा कुडाळ तालुका अध्यक्ष चंद्रकांत वालावलकर याच्या पुढाकाराने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवस संपर्क स्वच्छता अभियान राबवून करण्यात येत आहे. या सेवा पंधरावड्याचा शुभारंभ संपूर्ण जिल्ह्यात सर्वप्रथम नेरुर जिल्हा परिषद मतदार संघातील वालावल या गावात करण्यात आला याचा देखील खूप आनंद होत आहे.

तसेच या विभागात जिल्हा परिषद आणि पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात विकास कामे पूर्ण झाल्यामुळे वालावल समतानगर हे कायमच भारतीय जनता पक्षाच्या बाजूने राहीले आहे. म्हणून आम्ही सुध्दा जेव्हा जेव्हा समाज बांधव आम्हाला हाक मारतात तेव्हा त्यांच्या सोबत ठामपणे असतो. या समाजातील प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीचे नाते असल्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रत्येक कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा होत असतो असे गौरवोद्गार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.रणजीत देसाई काढले.

या कार्यक्रमात अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री चंद्रकांत जाधव यांनी पंतप्रधान सन्मा नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपर्क स्वच्छता अभियान साजरा करण्याबाबत मार्गदर्शन केले. अनुसूचित जाती व जमातींना केंद्र सरकारच्या ज्या विविध योजना आहेत त्याबद्दल माहिती दिली. जिल्हा उपाध्यक्ष अनंत आसोलकर, सरपंच निलेश साळसकर,माजी सरपंच राजेश प्रभु ,उपसरपंच संदेश मठकर, ग्रामपंचायत सदस्य दिपीका वालावलकर, कुडाळ तालुका मंडल अनुसूचित मोर्चा अध्यक्ष चंद्रकांत वालावलकर, मनीष वंजारी, कृष्णा , वालावलकर, जेष्ठ नागरिक विष्णू वालावलकर, समिर वालावलकर, चिन्मय वालावलकर, भूषण वालावलकर,राजेश वालावलकर,सुरज वालावलकर,सागर वालावलकर,बाळू वालावलकर,महेश वालावलकर, दिनेश वालावलकर,गितांजली वालावलकर, प्रज्ञा वालावलकर, राजश्री वालावलकर, अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर वालावल समता नगर मधील मुख्य रस्त्यालगत असलेली झाडी तोडून व गटाराची साफसफाई करून सेवा पंधरावड्याची सुरुवात करण्यात आली.

error: Content is protected !!