वैभव माणगांवकर / मालवण : मालवण तालुक्यातील वायरी जाधववाडी येथील राहणाऱ्या धीरज संजय भगत (वय :२५) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे.
वायरी जाधववाडी येथील अविवाहित असलेला धीरज हा तारकर्ली येथील पर्यटन केंद्रात कामाला होता. शांत व मितभाषी या स्वभावामुळे तो परिचित होता. धीरज याने आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बाजारातून भाजी आणून घरात दिली व तो बाहेर गेला. त्यानंतर धीरज याचा मृतदेह लगतच असलेल्या एका रिसॉर्टच्या मागील जिन्याला गळफास लावलेल्या स्थितीत ग्रामस्थांना दिसून आला. या ठिकाणी ग्रामस्थानी धाव घेतली होती.याबाबतची माहिती मालवण पोलीसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, उपनिरीक्षक सचिन पाटील, सिद्धेश चिपकर, पांचाळ यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनसाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात नेहण्यात आला. धीरज यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या बाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भारत फारणे करत आहेत.