सुख शांती मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम..!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
सुख शांती मंडळ हे साळशी गावातील विविध उपक्रम राबविणारे मंडळ आहे. या प्रशालेतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे कौतुकास्पद आहे असे मत सुख शांती मंडळाचे अध्यक्ष अशोक कदम यांनी साळशी येथे केलेे.
देवगड तालुक्यातील साळशी सरमळेवाडी येथील सुख शांती मंडळाच्या वतीने माध्यमिक विद्यामंदिर साळशी या प्रशालेतील इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी ते बोलत होते तसेच या प्रशाळेने या वर्षी १००% निकाल लावल्याबद्दल शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
सन २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत विशाल भिसे (प्रथम क्रमांक) हर्षाली पवार (द्वितीय क्रमांक) चिन्मयी घाडी (तृतीय क्रमांक) या गुणवत्ता विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मंडळाचे वतीने भेटवस्तू व सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच अशोक कदम व शशिकांत लाडगावकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देण्यात आले तसेच या शाळेने १००% निकाल लावल्याबद्दल शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच या प्रशालेचे सहाय्यक शिक्षक पुरुषोत्तम साटम यांना राज्यस्तरीय गुणवंत गुरु गौरव शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मंडळाचे सचिव राजेंद्र साटम यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी या उद्देशाने सुख शांती मंडळाच्या वतीने गेले आठ वर्षे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा उपक्रम राबविण्यात येत आहे असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या प्रशालेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे यांनी सुख शांती मंडळाने सामाजिक बांधिलकी या नात्याने राबविलेला उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्यास सांगून मंडळाचे आभार मानले सहाय्यक शिक्षक पुरुषोत्तम साटम यांनी आपल्या सूत्रसंचालनातून मंडळाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा स्तुत्य उपक्रम आहेे स्वप्नील भरणकर यांनी मंडळांनी राबवलेल्या उपक्रमाबद्दल मंडळाच्या सर्व पदाधिकारी व उपस्थितीतांचे आभार मानले शेवटी मंडळाच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक कदम सचिव राजेंद्र साटम शशीकांत लाडगावकर विजय लाडगावकर किशोर रावले प्रकाश अनंत रावले यशवंत लाड प्रकाश रावले सुरेश कदम सुनील लाड हर्षल रावले चंदू घाडी मुख्याध्यापक माणिक वंजारे सहशिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी उपस्थित होते.