28.6 C
Mālvan
Tuesday, December 3, 2024
IMG-20240531-WA0007

एक सुंदर स्वप्न संकल्पना साकार : माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर.

- Advertisement -
- Advertisement -

मालवणसाठी सौंदर्याची दृष्टी आणि आडारी गणपती मंदिर परिसरात साकार झाली सुशोभीत सृष्टी.

आडारी गणपती मंदिर परिसरातील सुशोभीकरण कामाने एक संकल्पना स्वप्न साकार झाल्याची माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांची भावना.

खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्याबद्दल माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी मानले वैयक्तीक , मालवणवासीय व त्यांच्या सहकार्यांतर्फे आभार.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या आडारी गणेश मंदिर भागातील उच्च दर्जाचे सुशोभिकरण या प्रकाराबद्दल माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी आनंद व समाधान व्यक्त केले आहे.
प्रसिद्धी पत्राद्वारे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी त्यांच्या भावना एक माजी नगराध्यक्ष व मालवणवासिय अशा दोन्ही स्वरुपात मांडल्या आहेत.

काही वर्षांपूर्वी गवंडीवाडा येथील स्विमिंग प्रशिक्षक प्रफुल्ल गवंडे यांनी एक व्हिडिओ पाठवून अस सुशोभीकरण मालवण येथे कुठे करता येतील का पाहावे अशी सूचना केली होती. आडारी गणपती मंदिर परिसर सुशोभीकरण ही संकल्पना मनामध्ये होती आणि हा व्हिडिओ बघितल्यावर अशा प्रकारे सुशोभीकरण आडारी या ठिकाणी करण्याबाबतची कल्पना माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी आमदार वैभवजी नाईक आणि खासदार विनायकजी राउत यांच्या कडे बोलून दाखवली. त्यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्या सहकार्यांनी देखील या संकल्पनेला पाठिंबा दर्शविला.

त्या नंतर खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक त्यांनी तात्काळ आडारी गणपती मंदिर परिसरातील सुशोभिकरणाबाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना केली. त्या कामासाठी त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून रु.25 लाख एवढा निधी मंजूर करून दिला आणि आज हे काम पूर्णत्वास येत आहे.
मध्यंतरी कोविड च्या संकटामुळे या कामाला थोडा वेळ लागला , पण आज काम पूर्ण झाल्याचा आनंद आहे असे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी आवर्जून सांगितले आहे. माजीनगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हणले आहे की आडारी गणपती मंदिर हे धार्मिक ठिकाण व पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे
त्यामुळे आता सुशोभीकरण केल्याने या ठिकाणी पर्यटक वाढतीलच पण मालवणवासीयांसाठीही एक विरंगुळा ठिकाण निर्माण झाले आहे आणि त्यामुळे या ठिकाणी स्थानिक लोकांना रोजगार निर्मितीची संधी प्राप्त झाली आहे.
या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी आमदार वैभवजी नाईक आणि खासदार विनायकजी राऊत यांचे मालवणवासीयांतर्फे व वैयक्तिक जाहीर आभार मानले आहेत.

‘मालवणसाठी सौंदर्याची दृष्टी आणि आडारी गणपती मंदिर परिसरात साकार झाली सुशोभीत सृष्टी’ अशी समाधानाची भावना सध्या मालवणच्या नागरीकांतून व्यक्त होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवणसाठी सौंदर्याची दृष्टी आणि आडारी गणपती मंदिर परिसरात साकार झाली सुशोभीत सृष्टी.

आडारी गणपती मंदिर परिसरातील सुशोभीकरण कामाने एक संकल्पना स्वप्न साकार झाल्याची माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांची भावना.

खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्याबद्दल माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी मानले वैयक्तीक , मालवणवासीय व त्यांच्या सहकार्यांतर्फे आभार.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या आडारी गणेश मंदिर भागातील उच्च दर्जाचे सुशोभिकरण या प्रकाराबद्दल माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी आनंद व समाधान व्यक्त केले आहे.
प्रसिद्धी पत्राद्वारे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी त्यांच्या भावना एक माजी नगराध्यक्ष व मालवणवासिय अशा दोन्ही स्वरुपात मांडल्या आहेत.

काही वर्षांपूर्वी गवंडीवाडा येथील स्विमिंग प्रशिक्षक प्रफुल्ल गवंडे यांनी एक व्हिडिओ पाठवून अस सुशोभीकरण मालवण येथे कुठे करता येतील का पाहावे अशी सूचना केली होती. आडारी गणपती मंदिर परिसर सुशोभीकरण ही संकल्पना मनामध्ये होती आणि हा व्हिडिओ बघितल्यावर अशा प्रकारे सुशोभीकरण आडारी या ठिकाणी करण्याबाबतची कल्पना माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी आमदार वैभवजी नाईक आणि खासदार विनायकजी राउत यांच्या कडे बोलून दाखवली. त्यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्या सहकार्यांनी देखील या संकल्पनेला पाठिंबा दर्शविला.

त्या नंतर खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक त्यांनी तात्काळ आडारी गणपती मंदिर परिसरातील सुशोभिकरणाबाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना केली. त्या कामासाठी त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून रु.25 लाख एवढा निधी मंजूर करून दिला आणि आज हे काम पूर्णत्वास येत आहे.
मध्यंतरी कोविड च्या संकटामुळे या कामाला थोडा वेळ लागला , पण आज काम पूर्ण झाल्याचा आनंद आहे असे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी आवर्जून सांगितले आहे. माजीनगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हणले आहे की आडारी गणपती मंदिर हे धार्मिक ठिकाण व पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे
त्यामुळे आता सुशोभीकरण केल्याने या ठिकाणी पर्यटक वाढतीलच पण मालवणवासीयांसाठीही एक विरंगुळा ठिकाण निर्माण झाले आहे आणि त्यामुळे या ठिकाणी स्थानिक लोकांना रोजगार निर्मितीची संधी प्राप्त झाली आहे.
या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी आमदार वैभवजी नाईक आणि खासदार विनायकजी राऊत यांचे मालवणवासीयांतर्फे व वैयक्तिक जाहीर आभार मानले आहेत.

'मालवणसाठी सौंदर्याची दृष्टी आणि आडारी गणपती मंदिर परिसरात साकार झाली सुशोभीत सृष्टी' अशी समाधानाची भावना सध्या मालवणच्या नागरीकांतून व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!