IMG-20240531-WA0007

विकास कामांच्या बाबतीत आमचा ‘ॲप्रोच’ कायमस्वरुपी : माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर.

मालवण बाजारपेठेतील डिझ़ेल पंपासमोरील तो तात्पुरता ‘ॲप्रोच वे’ बनणार कायमस्वरुपी..!

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर ,माजी बांधकाम सभापती व नगरसेवक यतीन खोत व सहकार्यांच्या कार्यकालात प्रशासकीय मंजूरीसाठी गेलेला आराखडा.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या बाजारपेठ किनारपट्टी भागातील डिझेल पंपाच्या समोरील ॲप्रोच वे तात्पुरत्या स्वरुपात सुरळीत करण्यात आला आहे. या ठिकाणी कायमस्वरुपी तोडगा असलेले काम नगरपरिषदेचा माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर , माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत व सहकार्यांनी त्यांच्या कार्यकालात आखून ते प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे .

आता सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरुपात नागरिकांच्या मागणी नुसार सिमेंट पाईप टाकून जाणे येणे साठी मार्ग सुरळीत करण्यात आलेला आहे . लवकरच प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्यावर कायम स्वरूपी उपाययोजना केली जाईल असे या मोरीवरील कामाच्यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी सांगितले. त्यावेळी त्यांच्या सोबत माजी बांधकाम सभापती यतीन खोत हेही उपस्थित होते.

मालवणच्या विकासकामांच्या बाबतीत आपला व आपल्या सहकार्यांचा ॲप्रोच हा नेहमीच कायमस्वरुपी व ठोस पद्धतीच्या आराखड्यांचा होता आणि तो तसाच राहील असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर आणि माजी बांधकाम सभापती व नगरसेवक यतीन खोत यांनी केले आहे.

मालवण बाजारपेठेतील डिझ़ेल पंपासमोरील तो तात्पुरता 'ॲप्रोच वे' बनणार कायमस्वरुपी..!

error: Content is protected !!