मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
देवगड तालुक्यातील नारिंग्रे गावचे सुपुत्र व घाडीगांवकर सह. पतपेढीचे अध्यक्ष रघुवीर शां. वायंगणकर यांना “महाराष्ट्र रक्षक” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यापूर्वी वायंगणकर यांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार, महाराष्ट्र समाज भुषण गौरव पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, सिंधुदूर्ग रत्न पुरस्कार,कोकण रत्न पुरस्कार आदी विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
नारिंग्रे शिक्षण संस्था, मुंबईचे सहचिटणीस म्हणून सुद्धा ते काम पाहत आहेत.तर मराठी वृत्तपत्रलेखक संघ, महा. राज्यचेते सदस्य आहेत.श्री रघुवीर वायंगणकर हे सामाजिक बांधिलकीतून घाडीगावकर समाजाचे वधू वर मेळावे आयोजित करतात.
तसेच मुंबईतील व ग्रामीण भागातील अनेक सामाजिक व क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते प्रेमळ मनमिळावू व प्रामाणिक स्वभावाचे असल्यामुळे अनेकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
रघुवीर वायंगणकर यांनी समाजात विविध क्षेत्रात चांगले समाजकार्य करण्या बरोबरच गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत कोविड जनजागृती करून कोविड पिडीतांची सेवा सुध्दा केली होती. कोविड काळातील योगदान लक्षात घेऊन साप्ताहिक प्रकट महाराष्ट्र व प्रकट महाराष्ट्र वृत्तवाहिनी च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते त्यांना “महाराष्ट्र रक्षक” पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम ०२ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ०१.०० या वेळेत नगरपंचायत सभागृह कणकवली येथे होणार आहे. अशा सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यास त्याच्या कार्याची पोच म्हणून साप्ताहिक प्रकट महाराष्ट्र व प्रकट महाराष्ट्र वृत्त वाहिनीने निवड केली आहे .त्याबद्दल विविध संस्थांकडून आणि कार्यकर्त्यांकडून, तसेच ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
अभिनंदन श्री रघुवीरजी