26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

क्रीडा तपस्वी अशोक दाभोलकर, शशिकांत गवंडे यांचा बेळगाव येथे सन्मान..!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
शामरंजन बहुउद्देशीय फाऊंडेशन मुंबई व विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र आयोजित ” राष्ट्रीय संस्कृती ” संमेलन लोकमान्य रंगमंदिर बेळगाव येथे दिमाखात संपन्न झाले. यावेळी राष्ट्रीय स्तरावर क्रीडा तसेच सामाजिक क्षेत्रात दिलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल सिंधुदुर्ग वेंगुर्ल्याचे सुपुत्र क्रीडा तपस्वी अशोक दाभोलकर (दाभोली) ह्यांना “भारत कर्तव्यम क्रीडा समाजभूषण पुरस्कार:२०२२” व शशिकांत गवंडें ह्यांना “शिवछत्रपती एकात्मता पुरस्कार:२०२२” तसेच शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सदर संमेलनात केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. रविंद्र कोल्हे तसेच डॉ. स्मिता कोल्हे ह्यांच्या शुभहस्ते साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना सन्मानीत करण्यात
आले. संमेलनाचे उद्घाटक श्री. अशोक दाभोलकर हे होते तसेच व्यासपीठावर सर्वश्री संदिप राक्षे ( संमेलनाध्यक्ष), दिपक बोडरे, बाबाजी शिंदे, डॉ .बी. एन. खरात, कृष्णा बामणे, श्रीमती स्वाती पवार, श्रीमती रिया पाटील हे मान्यवर उपस्थित होते.
संमेलनात पद्मश्री डॉ .रविन्द्र कोल्हे, संदिप राक्षे तसेच अशोक दाभोलकर ह्यानी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर केले तसेच प्रास्ताविक व आभार डॉ बी. एन. खरात यांनी मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

1 Comment

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
शामरंजन बहुउद्देशीय फाऊंडेशन मुंबई व विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र आयोजित " राष्ट्रीय संस्कृती " संमेलन लोकमान्य रंगमंदिर बेळगाव येथे दिमाखात संपन्न झाले. यावेळी राष्ट्रीय स्तरावर क्रीडा तसेच सामाजिक क्षेत्रात दिलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल सिंधुदुर्ग वेंगुर्ल्याचे सुपुत्र क्रीडा तपस्वी अशोक दाभोलकर (दाभोली) ह्यांना "भारत कर्तव्यम क्रीडा समाजभूषण पुरस्कार:२०२२" व शशिकांत गवंडें ह्यांना "शिवछत्रपती एकात्मता पुरस्कार:२०२२" तसेच शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सदर संमेलनात केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. रविंद्र कोल्हे तसेच डॉ. स्मिता कोल्हे ह्यांच्या शुभहस्ते साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना सन्मानीत करण्यात
आले. संमेलनाचे उद्घाटक श्री. अशोक दाभोलकर हे होते तसेच व्यासपीठावर सर्वश्री संदिप राक्षे ( संमेलनाध्यक्ष), दिपक बोडरे, बाबाजी शिंदे, डॉ .बी. एन. खरात, कृष्णा बामणे, श्रीमती स्वाती पवार, श्रीमती रिया पाटील हे मान्यवर उपस्थित होते.
संमेलनात पद्मश्री डॉ .रविन्द्र कोल्हे, संदिप राक्षे तसेच अशोक दाभोलकर ह्यानी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर केले तसेच प्रास्ताविक व आभार डॉ बी. एन. खरात यांनी मानले.

error: Content is protected !!