मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
अवघ्या चार दिवसाच्या कालावधीत मुलांकडून उत्कृष्ट रित्या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळानंतर मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी आता सुरुवात झाली असताना मुलांनी अल्पावधीत इतके सुंदर सादरीकरण केले हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सरपंच सौ साक्षी गुरव यांनी येथे केले.
देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलच्या सभागृहात विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी सरपंच सौ.साक्षी गुरव यांनी आरोग्य सेविका श्रीमती चराटकर, सर्व अंगणवाडी सेविका, तलाठी विना मेहेंदळे, ग्रामसेवक महेश कुबल, ग्रामपंचायत कर्मचारी श्री संतोष पुजारे, श्री मोतीराम वळंजु, पवन स्पोर्ट अकॅडमी चे अनिकेत पाटील, तसेच श्री शंकर सूर्यकांत मुनगेकर यांचे विशेष आभार मानले.
प्राथमिक शाळेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ दिपाली वारंग यांनी केले तर माध्यमिक प्रशालेचे सूत्रसंचालन सौ गौरी तवटे यांनी केले.
यावेळी उपसरपंच श्री धर्माजी आडकर यांनी देखील मुलांचे कौतुक केले. मुलांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशा सौ. वारंग मॅडम व कुंज मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रस्तरावर व तालुकास्तरावर आपली चमक दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पारितोषिके देण्यात आली. तसेच गावचा विद्यार्थी कुमार प्रथमेश सुनील पुजारे याने आचरा मिनी मॅरेथॉन स्पर्धेत तृतीय पारितोषिक मिळवल्याबद्दल त्याला सन्मानित करण्यात आले. यावेळी श्री भगवती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती एम बी कुंज, ग्रामपंचायत सदस्य श्री दशरथ मुणगेकर, श्री संजय घाडी, श्री प्रमोद सावंत, तसेच सदस्य सौ अंजली सावंत, सौ .रवीना मालाडकर, सौ. निकिता कांदळगावकर, पोलीस पाटील सौ साक्षी सावंत, श्री गोविंद सावंत, श्री अरविंद सावंत, श्री देवदत्त पुजारे, श्री सुरेश बोरकर, सौ गौरी तवटे, सौ.कुमठेकर, श्री एन. जी. विरकर, हरीश महाले, गुरुप्रसाद मांजरेकर, प्रियांका कासले, तसेच प्राथमिक प्रशालेचे शिक्षक वर्ग सौ दिपाली वारंग, श्री राणे, श्री मंगेश हिर्लेकर, श्री कराडे,
श्री रासम, संतोष मुणगेकर आदी उपस्थित होते. आभार प्रणय महाजन यांनी मानले.