वैभववाडी | प्रतिनिधी :
महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबईचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी रोटरी क्लब ऑफ वैभववाडी रावराणे चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व बी. के .एल. वालावलकर रुग्णालय,डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आनंदीबाई रावराणे विद्यालय वैभववाडी येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात हर्निया,अल्सर,अपेंडिक्स, थायरॉईड,मुळव्याध, मुतखडे, चरबीच्या गाठी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया,पित्ताशयातील खडे, कान,नाक,घसा, शस्त्रक्रिया, कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया, महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया, आदी शस्त्रक्रिया या शिबिरात होणार आहेत.
शिबिरात सहभागी होणा-या रुग्णांनी मागील आजारांच्या तपासणीचे रिपोर्ट व चालू औषधे घेऊन येणे. सदर शिबिरामध्ये शस्त्रक्रिया करण्यायोग्य रुग्ण आढळल्यास केसरी व पिवळ्या रेशन कार्डधारकांसाठी मोफत शस्त्रक्रिया केली जाईल.अधिक माहितीसाठी प्रमोद रावराणे, संजय रावराणे, सुधीर नकाशे, संतोष टक्के, प्रशांत गुळेकर, प्रवीण पेडणेकर,सागर रावराणे, विनायक रावराणे, राजेंद्र राणे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.