संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत देवगड तालुक्यातील चाफेड ग्रामपंचायत, गावठण आणि भोगलेवाडी प्रशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने चाफेड ग्रामपंचायतीमध्ये लहान मुलांचे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर ईशस्तवन, समूहगीत, स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्वांनी भारतमाता की जय,वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या.यावेळी मुलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
याप्रसंगी सुरुवातीला ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. संचिता भोगले,उपसरपंच सुनील धुरी, शाळा न.१ चे व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन मोंडकर, भोगलेवाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल परब, माजी सरपंच संतोष साळसकर,ग्रामसेविका सौ. मनीषा मांडे,शिक्षक विकास वाडीकर, औदुंबर माने, सौ. रश्मी आंगणे,सौ. गौरी नारकर,वैभव मराठे,पोलीस पाटील संतोष सावंत, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष विजय परब,प्रवीण राणे, सुनील कांडर, पंढरीनाथ कांडर, आशा स्वयंसेविका सौ. प्रणिता राणे,सी.आर.पी. सौ. समीक्षा घाडी, माजी उपसरपंच दीपक राणे, ग्रा. पं. सदस्या सौ. वैशाली कांडर, सौ. सुवर्णा पांचाळ,सौ. दीप्ती पाटील,वासुदेव ( बबन) गावकर,वासुदेव परब,प्रकाश भोगले,आरोग्य सेविका सौ. छाया बागवे, डाटा ऑपरेटर सौ स्वप्नाली परब, अंगणवाडी मदतनीस सौ. दिक्षिता घाडीगावकर, प्रदीप घाडी, लीलावती मेस्त्री आदींसह ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.