संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देशात सर्वत्र एक ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत आजादी का अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत सर्व शाळा महाविद्यालये शासकीय कार्यालय यांच्यामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.देवगड तालुक्यातील फणसगाव कला वाणिज्य महाविद्यालय फणसगाव तर्फे देखील या मोहिमेवर अंतर्गत दिनांक ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यापैकी एक उपक्रम म्हणून दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजी ग्रामपंचायत विठ्ठलादेवीच्या सहयोगाने आणि महाविद्यालयाच्या N.S.S विभागाद्वारे फणसगाव कॅन्टीन आणि उंडील तिठा परिसरात प्लास्टिक बॅग आणि इतर कचरा गोळा करून परिसर साफ करण्यात आली.
यावेळी एन.एस.एस.चे सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ.अनुश्री उ. नारकर एन.एस.एस. विभाग प्रमुख प्रा. जान्हवी नारकर आणि प्रशासकीय विभाग प्रमुख प्रा.आशिष ढेकणे सर आणि इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.