विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव चिंदर ग्रामपंचायत मध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. १० ऑगस्ट २०२२ ला सकाळी १०.३० वाजता ग्रामपंचायत परिसरात स्वच्छता कार्यक्रम, ११ ऑगस्टला संध्याकाळी ३ वाजता गावचा इतिहास व महिला मेळावा-ग्रामपंचायत कार्यालय, १२ ऑगस्टला प्रत्येक अंगणवाडीत गोपाळांची पंगत आणि पाककला, १३ ऑगस्टला ग्रामपंचायत कार्यालय येथे शेतकरी मेळावा मार्गदर्शक कृषी सहाय्यक सुनिल कदम, १४ ऑगस्टला ग्रामपंचायत कार्यालय येथे ७५ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना वृक्षवाटप तसेच पर्यावरण शपथ व वृक्षारोपण,११ वाजता ग्रामपंचायत स्थापने पासुन निवडून आलेल्या सर्व माजी सरपंचाचा सत्कार, १५ ऑगस्टला सकाळी ८ ते ९.३० ध्वजा रोहन आणि प्रभात फेरी, ९.३० वाजता स्वातंत्र्य सैनिक कै. रामचंद्र बिले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना मानवंदना, १०.३० ते १२ मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, १२ ते १ महिला आरोग्य तपासणी (ब्लड प्रेशर-डायबिटीस), १६ ऑगस्टला कुंभारवाडी शाळा येथे सकाळी १०.३० वाजता देशभक्तीपर चित्रपट दाखवणे व सांगता होणार आहे. सरपंच सौ. राजश्री कोदे व उपसरपंच दिपक सुर्वे यांनी हि माहिती दिली.