अभ्यासू समाजसेवी हरपल्याने जिल्ह्यातून व्यक्त होतेय हळहळ..!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील हिंदळे – प्रभुवाडी येथील ज्येष्ठ नागरिक, माजी ग्रामपंचायत सदस्य तथा जेष्ठ गणेशमूर्तीकार, सामाजिक कार्यकर्ते शांताराम हिरोजी कुंभार ( वय वर्षे ८६ ) यांचे बुधवार दिनांक ३ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता निधन झाले.
हिंदळे दशक्रोशीत ते सुप्रसिद्ध गणेशमूर्तिकार म्हणून प्रख्यात होते.तसेच सामाजिक करायची त्यांचा खूप आवड होती. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव आणि दानशूरपणा त्यांच्या अंगी असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,सूना,एक विवाहित मुलगी, एक मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
राज्य पुरस्कारप्राप्त केंद्रप्रमुख अशोक रावजी कुंभार यांचे ते चुलत जेष्ठ बंधू होत.