24.9 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ओरोस येथे सत्कार..!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एकत्रित सत्कार करून चांगला उपक्रम संघटनेने राबविला आहे. भविष्यात सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम राबविल्यास आपले सहकार्य लाभेल असे प्रतिपादन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमण पाटील यांनी ओरोस येथे केले.
महाराष्ट्र राज्य एच. एस. सी. व्होकेशनल व अशासकीय तांत्रिक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग जिल्हा वतीने जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय सिंधुदुर्ग येथे सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पी. के. चौकेकर (सेवानिवृत्त लिपिक,  टोपीवाला हायस्कूल मालवण), सायमन फर्नांडिस (एस एम एस स्कूल कणकवली),  बाबुराव आरोलकर (सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिरोडा हायस्कूल) व लक्ष्मण आत्माराम पंडित (चतुर्थ श्रेणी कर्मचारी, आर पी डी हायस्कूल सावंतवाडी) हे  शिक्षकेतर कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांना सन्मानित करण्यात आले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन मसुरे तांत्रिक विद्यालय लिपिक तथा संघटना सचिव भानुदास परब यांनी केले. यावेळी संघटना अध्यक्ष मिलिंद जाधव, श्री डिसोझा सर, रमेश जाधव,श्री करंगुटकर यांनी शुभेच्छा दिल्या. मालवण येथील सेवानिवृत्त लिपिक श्री. पी. के. चौकेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सर्वांच्या चांगल्या सहकार्याबद्दल आभार मानले. यावेळी लिपिक श्री दशरथ सावंत, जाधव सर, श्रीकरंगुटकर,श्रीमती साक्षी धुरी, शंकर खंडवी, श्री धूमक, श्री त्वर, श्री मोर्जे, श्री दळवी, श्री पालयेकर, श्रीमती लंगडे, श्रीमती मनचेकर, श्रीमती शिंत्रे, श्रीमती पालव,श्रीमती वेंगुर्लेकर, नागेश कदम, सुरेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एकत्रित सत्कार करून चांगला उपक्रम संघटनेने राबविला आहे. भविष्यात सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम राबविल्यास आपले सहकार्य लाभेल असे प्रतिपादन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमण पाटील यांनी ओरोस येथे केले.
महाराष्ट्र राज्य एच. एस. सी. व्होकेशनल व अशासकीय तांत्रिक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग जिल्हा वतीने जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय सिंधुदुर्ग येथे सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पी. के. चौकेकर (सेवानिवृत्त लिपिक,  टोपीवाला हायस्कूल मालवण), सायमन फर्नांडिस (एस एम एस स्कूल कणकवली),  बाबुराव आरोलकर (सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिरोडा हायस्कूल) व लक्ष्मण आत्माराम पंडित (चतुर्थ श्रेणी कर्मचारी, आर पी डी हायस्कूल सावंतवाडी) हे  शिक्षकेतर कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांना सन्मानित करण्यात आले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन मसुरे तांत्रिक विद्यालय लिपिक तथा संघटना सचिव भानुदास परब यांनी केले. यावेळी संघटना अध्यक्ष मिलिंद जाधव, श्री डिसोझा सर, रमेश जाधव,श्री करंगुटकर यांनी शुभेच्छा दिल्या. मालवण येथील सेवानिवृत्त लिपिक श्री. पी. के. चौकेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सर्वांच्या चांगल्या सहकार्याबद्दल आभार मानले. यावेळी लिपिक श्री दशरथ सावंत, जाधव सर, श्रीकरंगुटकर,श्रीमती साक्षी धुरी, शंकर खंडवी, श्री धूमक, श्री त्वर, श्री मोर्जे, श्री दळवी, श्री पालयेकर, श्रीमती लंगडे, श्रीमती मनचेकर, श्रीमती शिंत्रे, श्रीमती पालव,श्रीमती वेंगुर्लेकर, नागेश कदम, सुरेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!