मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे ७ ऑगस्ट रोजी संतांच्या अनमोल दीव्य पादुका दर्शन सोहळा सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
पादुका दर्शन सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड
यांच्या विनंतीनुसार विजयदुर्ग व देवगड आगारातून ज्यादा एसटी गाड्यांची सोय करण्यात आली आहे. देवगड व विजयदुर्ग आगारातून गाड्या सोडण्यात येणार आहेत. भाविकांना स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका, श्री साईनाथ महाराजांच्या मुळ पादुका,
श्री रामदास स्वामींच्या मुळ पादुका, श्री गगनगिरी महाराजांच्या मुळ पादुका,
श्री वासुदेवानंद महाराज टेंबे स्वामी मुळ पादुकांचे दर्शन घेता येणार आहे.
सकाळी १० वाजता हिंदळे आगा दुकान- मिठबाव-दहिबाब-लिंगडाळ गणपती मंदिर-कोटकामते भगवती मंदिर- किंजवडे- आरे- आरे फाटा मार्गे -शिरगाव – स्वामी समर्थ मठ हडपीड अशी फेरी असणार आहे.
तसेच सकाळी १० वाजता कातवण-कातवणेश्वर- कुणकेश्वर-इळये-दाभोळे-दाभोळे गणपती मंदिर-लिंगडाळ गाव-लिंगडाळ तिठा मार्गे हडपीड मठ.तिसरी फेरी सकाळी १० वाजता विजयदुर्ग आगारातून सुटणार असून ही फेरी विजयदुर्ग -गिर्ये-पडेल-रेडेटाका-बापर्डे-पावणाई-वानिवडे-तळेबाजार मार्गे हडपीड मठ अशी सोडण्यात येणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी संचलित श्री स्वामी समर्थ हडपिडच्या वतीने संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर व अध्यक्ष प्रभाकर राणे यांनी केले आहे.