29.9 C
Mālvan
Friday, March 14, 2025
IMG-20240531-WA0007

ग्रामीण रुग्णालय मालवण येथे १३ ऑगस्टला ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता शिबिराचे आयोजन..!

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव / संतोष साळसकर :
रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर ट्रस्टच्या वतीने कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराडआणि त्यांचा कॅन्सर केअर विभाग व सिव्हिल हॉस्पिटल, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय मालवण येथे दिनांक १३ ऑगस्टला दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजता या वेळेत”ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता शिबिर” आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामधे कर्करोगाचे तज्ञ डॉक्टर स्तनाचा कर्करोग असलेल्या रूग्णांची तसेच नवीन संशयित स्तनाच्या कर्करोग रुग्णांची मोफत तपासणी करून केमोथेरपी / रेडिओथेरपी इत्यादी उपचार व शस्त्रक्रियेसाठी योग्य मार्गदर्शन करतील. KIMS कॅन्सर टीम अंतर्गत पश्चिम महाराष्ट्राचे प्रसिद्ध स्तन कर्करोग तज्ञ सर्जन प्रा. डॉ. सुरेशजी भोसले
(KIMS कराड) रुग्णांना सल्ला देतील आणि मार्गदर्शन करतील. आपल्या गरजू रुग्णांना या शिबिराचा लाभ व्हावा हि आमची प्रामाणिक इच्छा आहे.यासाठी कृपया आपल्या रुग्णांना या शिबिराची माहिती देवून शिबिराचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. शक्य असल्यास या रुग्णांची यादी आम्हाला पाठवा. आम्ही त्यांना व्यक्तिशः संपर्क करू.
शिबिरातील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार या अनुषंगाने रुग्णांना पुढील निर्णयासाठी तुमच्याकडे परत पाठविण्यात येईल. कृपया या रुग्णांची नोंदणी करा आणि गरीब आणि गरजू स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांना मदत करा. येथून मालवण साठी गाडीची व्यवस्था करण्यात येईल.तरी नोंदणीसाठी संपर्क- डॉ. रामचंद्र चव्हाण ९४२३३०२७२०,रेडकर हॉस्पिटल मालवण ०२३६५-२५२११५,७५८८५४४७०० डॉ. केतकी जामसंडेकर यांच्याशी संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिरगांव / संतोष साळसकर :
रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर ट्रस्टच्या वतीने कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराडआणि त्यांचा कॅन्सर केअर विभाग व सिव्हिल हॉस्पिटल, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय मालवण येथे दिनांक १३ ऑगस्टला दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजता या वेळेत"ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता शिबिर" आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामधे कर्करोगाचे तज्ञ डॉक्टर स्तनाचा कर्करोग असलेल्या रूग्णांची तसेच नवीन संशयित स्तनाच्या कर्करोग रुग्णांची मोफत तपासणी करून केमोथेरपी / रेडिओथेरपी इत्यादी उपचार व शस्त्रक्रियेसाठी योग्य मार्गदर्शन करतील. KIMS कॅन्सर टीम अंतर्गत पश्चिम महाराष्ट्राचे प्रसिद्ध स्तन कर्करोग तज्ञ सर्जन प्रा. डॉ. सुरेशजी भोसले
(KIMS कराड) रुग्णांना सल्ला देतील आणि मार्गदर्शन करतील. आपल्या गरजू रुग्णांना या शिबिराचा लाभ व्हावा हि आमची प्रामाणिक इच्छा आहे.यासाठी कृपया आपल्या रुग्णांना या शिबिराची माहिती देवून शिबिराचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. शक्य असल्यास या रुग्णांची यादी आम्हाला पाठवा. आम्ही त्यांना व्यक्तिशः संपर्क करू.
शिबिरातील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार या अनुषंगाने रुग्णांना पुढील निर्णयासाठी तुमच्याकडे परत पाठविण्यात येईल. कृपया या रुग्णांची नोंदणी करा आणि गरीब आणि गरजू स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांना मदत करा. येथून मालवण साठी गाडीची व्यवस्था करण्यात येईल.तरी नोंदणीसाठी संपर्क- डॉ. रामचंद्र चव्हाण ९४२३३०२७२०,रेडकर हॉस्पिटल मालवण ०२३६५-२५२११५,७५८८५४४७०० डॉ. केतकी जामसंडेकर यांच्याशी संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!