कुडाळ । देवेंद्र गावडे
शुक्रवार । २२ जुलै, २०२२
अतिशय कमी वयामध्ये आपल्या ऐन तारूण्यातच ‘कोंकण भजन क्षेत्रा’मध्ये आपल्या अलौकिक भजन कलेच्या माध्यमातून आपली वैशिष्ट्यपूर्ण छाप सोडणा-या व अल्पावधीतच भजन रसिकांच्या मनात मानाची जागा पटकावणा-या..
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावचे सुपूत्र सुप्रसिद्ध बुवा श्री. वैभव सावंत यांना ‘आर्ट बिट्स् फाऊन्डेशन, पुणे’ यांच्यावतीने ‘युवा कला गौरव पुरस्कार-२०२२’ देऊन सन्मानित करण्यात आले.
सावंत कुटूंबातील आजोबांच्या काळापासून चालत आलेला हा भजन कलेचा वारसा बुवा श्री. वैभव सावंत आपले गुरू बुवा श्री. विशाल राणे यांच्या मार्गदर्शनाने यशस्विरित्या पूढे घेऊन जात आहेत.
ऐन तारूण्यात त्यांनी मिळवलेले हे यश व लोकप्रियता पाहून त्यांच्याविषयी फार अभिमान व कौतुक वाटत असल्याच्या भावना त्यांचे कुटूंबिय व सहकारी यांनी व्यक्त केल्या.
त्यांच्या या यशाबद्धल भजन क्षेत्रातील विविध मान्यवर व रसिकांकडून भरभरून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिस आहे.