मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
एक दिवस बळीराजासाठी उपक्रमा अंतर्गत जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा बांदिवडे नं. १ च्या विध्यार्थ्यांनी मळावाडी येथील शेतीत भातशेती लावणीचा अनुभव घेतला. यावेळी सर्व विद्यार्थी पालक, मुख्याध्यापक संतोष दयाळ आचरेकर, शिक्षिका श्रीम.विमल चव्हाण,अध्यक्ष श्री.किरण पवार, माजी अध्यक्ष-सखाराम परब, श्री कासले, जेष्ठ शेतकरी भाई मुणगेकर,अजय पडवळ, मंदा आईर आदी उपस्थित होते.