बांदा | राकेश परब :
माकडांनी बांदा शहरातील कट्टा कार्नर परिसरात अक्षरशः धुडगूस घातला आहे. गुरुवारी पाच वाजण्याच्या सुमारास सलुन दुकानात एका माकडाने आरसा व इतर सामानाची नासधूस केली. जवळपास सुमारे ७ हजारांचे नुकसान झाल्याचे सलून मालक नाना कदम यांनी सांगितले. कदम दुकानाबाहेर पळ काढल्याने बालाबल बजावले. सायंकाळी उशिरा नाना कदम यांच्या दुकानात नुकसाची पहाणी करताना बांदा वनपाल अनिल मेस्री यांना स्थानिक व्यापा-यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. वरिष्ठांची अधिका-याची चर्चा करून माकडाचा लवकरच बंदोबस्त केला जाईल असे आश्वासन मेस्त्री यांनी दिले.
माकडांचा सातत्यपूर्ण उपद्रव ही या भागातील नागरिकांची डोकेदुखी बनली आहे. वनविभागाने नुकसानीचे पंचनामे करावेत. अशी मागणी गेली दोन वर्षे सांगूनही वन विभागा झोपा काढत आहे. वनविभाग माणसांवर हल्ला केल्यास पुर्णता: वनविभाग जबाबदार राहील अशी नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्यांच्या सुमारास कदम यांच्या सलून दुकानात घुसून नुकसान आरसा व इतर वस्तूची मोठ्याप्रमाणात नुकसानीला झाले सुमारे ७ हजारांचे नुकसान झाले स्थनिकांनी माकडाला पळवून लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी पण मालक कदम यांच्या यांच्या अंगावर माकड येईल या भीतीने घाबरले.व पळ काढला. यावेळी तेथील स्थानिक दुकानदार संतोष चिंदरकर,गाैरांग शेर्लेकर, सुशील देसाई,अरविंद मांजरेकर, अरुण पराजंपे, आपा चिंदरकर,उमेश कुंबल,दिनकर सावंत,दिंगबर चव्हाण,नार्वेकर मदतीने आरडा ओरड करत पळवून लावले. बांदा शहरात माकाडांचा मोठ्याप्रमाणात त्रास सुरु आहे. अशा परिस्थितीत वनविभागाने माकडांचा वेळीच बदोबस्त करण्याची मागणी होत आहे. वनविभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत. तसेच उपद्रवी माकडांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी बांदा दशक्रोशीतील नागरिकांनी केली आहे.
बांद्यात माकडानी धुडगूस सुरु असल्याने कट्टा कार्नर येथील व्यापारी व स्थानिकांत भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्यात माकडाने सुजाता फोटो स्टुडओत प्रवेश करत दोन वेळा मिळून ७३ हजारांचे नुकसान झाले आहे. बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांनी प्रत्यक्ष पंचमाना ४० हजारांचे करण्यात आले. पणं एक महिना झाले तरी एक रुपायाही न मिळाल्याचे फोटो स्टुडिओचे मालक अजित दळवी यांनी सांगितले.
स्थानिक या माकडांना पळवून लावण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करत आहे. अँटम बाँम्ब , फटाके यांचा वापर करत पळवून लावत आहे. पणं यांचा माकडांवर कोणताही परिणाम दिसून येत आहे. यावर वनविभाग बघ्यांची भुमिका ,पहाणी व पंचनामा करण्यापुर्ती मर्यादित असल्याचे स्थानिकांतून बोलले जाते आहे.