सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अजय शिंदे यांनी केली जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे केली मागणी….!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा परिषदे मार्फत दरवर्षी शालेय क्रीडास्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने केले जाते. 64 विविध खेळांच्या स्पर्धा घेतल्या जातात. यासाठी सहभागी शाळांकडून फी भरुन घेतली जाते. ही फी क्रीडा परिषदमध्ये जमा होते या निधीतून वरिष्ठांजवळ मागणी प्रस्ताव सादर करून जिल्हा क्रीडाधिकारी यांनी शाळांना क्रीडा साहीत्य वितरित करावे अशी आग्रही मागणी सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अजय शिंदे यांनी केली आहे.
यावेळी कार्याध्यक्ष विजय मागाडे सचिव नंदु नाईक,उपाध्यक्ष विजय मयेकर, जयराम वायंगणकर,शंकर पराडकर,संजय परब,उत्तम मळगावकर, सुदिन पेडणेकर,विश्वनाथ सावंत,अजय सावंत,मारुती माने,दशरथ काळे,महेश जाधव,श्रीनाथ फणसेकर,जयकुमार पाटील,भास्कर नादकर,विनोद चव्हाण, विशाल पारकर,सुहास बांदेकर,हनुमंत सावंत,अंकुश मिरकर,शिवदास मसगे,हिराचंद तानावडे,वैभव कोंडसकर हे पदाधिकारी उपस्थित होते..
जिल्हा क्रीडा संकुल समितीकडे दरवर्षी साहित्य खरेदी केले जाते,परंतु ते क्रीडा परिषद मार्फत वितरित करता येत नसल्याने उपलब्ध साहित्य सडुन जात आहे.कित्येक बाॅल हे पंक्चर स्थितीमध्ये असल्याने ,भंगारची भर होत आहे अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
कोरोना मध्ये दोन वर्षे बंद असलेल्या स्पर्धा यावर्षी सुरळीत चालू होतील असे वाटत असताना सद्य परिस्थिती ,स्कूल गेम फेडरेशन ॴॅफ इंडिया च्या दोन संस्था कार्यरत झाल्याने जो पर्यंत हा वाद मिटत नाही तोपर्यंत शालेय स्पर्धा होतिल याच्या आशा धुसर झालेल्या आहेत असेही अजय शिंदे यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थी मैदानावर आणण्यासाठी विविध प्रयत्न क्रीडा शिक्षकांना करावे लागत असून ,साहीत्या अभावी अजुन अडचणींमध्ये वाढच होताना दिसत असल्याची खंत श्री.अजय शिंदे यांनी व्यक्त केली.
पोर्टल मध्ये क्रीडा शिक्षकांचे स्वतंत्र पद नसल्याने बहुतांशी शाळांमधुन क्रीडा शिक्षक हद्दपार होताना दिसतोय व तो नाहीसा होईल अशी भीतीही असल्याचे ते म्हणाले.
सुब्रतो मुखर्जी स्पर्धा १४ व १५ जुलै रोजी श्री.वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगांव येथे १४/१७ वयोगटात होणार आहेत.पण कित्येक शाळांमध्ये फुटबॉल उपलब्ध नसल्याने या स्पर्धेत सहभागी शाळांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या एव्हढी असल्याचे दिसून येत आहे, त्यातही सहभागी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा पंच्याहत्तर टक्के आहेत…
शासानाच्या क्रीडांगण विकास योजनेतून रुपये तिन लक्ष पर्यंत साहीत्य मागणी प्रस्ताव केल्यास साहित्य अनुदान मंजुर होते,परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची अडथळा शर्यत पार करणं संस्था,शाळा यांना न परवडणारे असल्याने कोणत्याही शाळा या साहित्य मागणीच्या भानगडीत पडत नाहीत.
साहित्य मागणी योजनेतिल अनुदान नियमावली मध्ये बदल करुन सर्व शाळांमध्ये साहित्य पुरविणे ही काळाची गरज आहे
व प्रोत्साहनात्मक अनुदान दरवर्षी शाळांना दिलं जात,१४,१७,व १९ वयोगटात प्रथम क्रमांक एक लाख, द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार, तृतीय क्रमांक पंचवीस हजार या प्रमाणे दरवर्षी साडेसात लाख रुपये वाटप होते, स्पर्धांमध्ये विजेत्यांना दहा ,सात,पाच या प्रकारे गुणांकन करून प्रोत्साहनात्मक अनुदान वाटप होते यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे अशी मागणी श्री शिंदे व श्री नाईक यांनी केली आहे.
कोरोना काळात दोन वर्षे वाटप न केलेले प्रोत्साहनात्मक अनुदान पंधरा लाख रुपये शिल्लक आहे या अनुदानाचा वापर साहित्य पुरविण्यासाठी करावा अशीही मागणी संपूर्ण संघटनेकडून व समाजातून जोर धरु लागली आहे असे श्री. अजय शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना कळविले आहे
स्तुत्य मागणी सहमत आहे आभार सर.