28.6 C
Mālvan
Tuesday, December 3, 2024
IMG-20240531-WA0007

टोपीवाला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकी दासबोधातील एक पान सेवानिवृत्त…! ( विशेष )

- Advertisement -
- Advertisement -

तज्ञ शिक्षक श्री. रामदास मणेरीकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार.

मालवण | सुयोग पंडित (विशेष) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या सुप्रसिद्ध टोपीवाला हायस्कूल व महाविद्यालयाला अतिशय तज्ञ व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या शिक्षकांचा वारसा लाभलेला आहे. इथला शिक्षक वर्ग एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांसाठीसुद्धा गुरुजन म्हणून सेवा बजावलेल्याची उदाहरणे आहेत. अशा शिक्षकांची निवृत्ती ही नियमानुसार किंवा शिक्षकांच्या स्वेच्छेनुसार जरी होत असली तरी टोपीवाला हायस्कूलचे प्रत्येक शिक्षक प्रतिनिधी हे अखंड विद्यार्थीप्रीय व शिक्षण आसक्त म्हणूनच नावाजले जातात.
श्री .रामदास केशव मणेरीकर हेही त्याच सेवाभावी शिक्षकी दासबोधातील एक महत्वाचे पान आहेत.

काल दिनांक 30 जुलैला टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयातील किमान कौशल्य विभागाकडील शिक्षक श्री. रामदास केशव मणेरीकर यांचा सेवानिवृत्ती निमीत्त सत्कार समारंभ टोपीवाला हायस्कूलच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी मालवण एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष माननीय श्री.दिगंबर सामंत, सचिव श्री. विजय कामत, संस्था सदस्य मा. श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व ज्येष्ठ तज्ञ शिक्षक श्री.डि.एस.खानोलकर सर, पर्यवेक्षक श्री.प्रभूखानोलकर सर उपस्थित होते .

या वेळी उपस्थीत तज्ञ व वक्त्यांनी त्यांच्या मनोगतात श्री. मणेरीकर सर शांत,संयमी, मनमिळावू आणि प्रत्येकाच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले. यावेळी मालवण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मणेरीकर सर यांना शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
आपल्या शिक्षकी कारकिर्दीच्या प्रशाला व महाधिद्यालयाकडून सत्कार झाल्यानंतर काहीशा गहिवरुन गेलेल्या वातावरणात सत्काराला उत्तर देताना श्री.
मणेरीकर सर यांनी आपल्याला सहकार्य केलेल्या सर्व व्यक्ती व घटकांचे आभार मानले.
शाळेने व संस्थेने दिलेले कोणतेही काम आपण प्रामाणिकपणे केल्याचेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी मुख्याध्यापक खानोलकर सर,पर्यवेक्षक प्रभू खानोलकर सर, सौ.गोसावी मॅडम, श्री. वेरलकर सर, श्री, गवळी सर, श्री. साटम सर, श्री. मसुरकर सर, श्री. जाधव सर, श्री. पाटील सर, सौ बांदेकर मॅडम यांनी आपली मनोगते सादर केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.चंद्रशेखर बर्वे तर उपस्थित सर्वांचे आभार श्री.रमेश जाधव यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अस्मिता रावराणे यांनी केले. श्री मणेरीकर सरांचा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री.रमण पाटील यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. मानवता विकास परिषद मुंबईचे अध्यक्ष श्रीकांत सावंत आणि श्री.राजन कामत यांनी पुष्पगुच्छ देऊन सरांचा सत्कार केला .माजी विद्यार्थिनी व माजी नगरसेविका निना मुंबरकर यांनीही सरांचा यथोचित सत्कार केला.

‘टोपीवाला हायस्कूलचा शिक्षकी दासबोध हा अखंडच आहे. परंतु जेंव्हा अशी सेवाभावी व विवेकी पाने सेवानिवृत्त होतात तेंव्हा आजी व माजी विद्यार्थीही भावनाविवश होतात’, अशी प्रतिक्रिया या सेवानिवृत्ती सत्कारानंतर टोपीवाला हायस्कूलच्या काही माजी विद्यार्थ्यांनी दिली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

तज्ञ शिक्षक श्री. रामदास मणेरीकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार.

मालवण | सुयोग पंडित (विशेष) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या सुप्रसिद्ध टोपीवाला हायस्कूल व महाविद्यालयाला अतिशय तज्ञ व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या शिक्षकांचा वारसा लाभलेला आहे. इथला शिक्षक वर्ग एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांसाठीसुद्धा गुरुजन म्हणून सेवा बजावलेल्याची उदाहरणे आहेत. अशा शिक्षकांची निवृत्ती ही नियमानुसार किंवा शिक्षकांच्या स्वेच्छेनुसार जरी होत असली तरी टोपीवाला हायस्कूलचे प्रत्येक शिक्षक प्रतिनिधी हे अखंड विद्यार्थीप्रीय व शिक्षण आसक्त म्हणूनच नावाजले जातात.
श्री .रामदास केशव मणेरीकर हेही त्याच सेवाभावी शिक्षकी दासबोधातील एक महत्वाचे पान आहेत.

काल दिनांक 30 जुलैला टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयातील किमान कौशल्य विभागाकडील शिक्षक श्री. रामदास केशव मणेरीकर यांचा सेवानिवृत्ती निमीत्त सत्कार समारंभ टोपीवाला हायस्कूलच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी मालवण एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष माननीय श्री.दिगंबर सामंत, सचिव श्री. विजय कामत, संस्था सदस्य मा. श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व ज्येष्ठ तज्ञ शिक्षक श्री.डि.एस.खानोलकर सर, पर्यवेक्षक श्री.प्रभूखानोलकर सर उपस्थित होते .

या वेळी उपस्थीत तज्ञ व वक्त्यांनी त्यांच्या मनोगतात श्री. मणेरीकर सर शांत,संयमी, मनमिळावू आणि प्रत्येकाच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले. यावेळी मालवण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मणेरीकर सर यांना शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
आपल्या शिक्षकी कारकिर्दीच्या प्रशाला व महाधिद्यालयाकडून सत्कार झाल्यानंतर काहीशा गहिवरुन गेलेल्या वातावरणात सत्काराला उत्तर देताना श्री.
मणेरीकर सर यांनी आपल्याला सहकार्य केलेल्या सर्व व्यक्ती व घटकांचे आभार मानले.
शाळेने व संस्थेने दिलेले कोणतेही काम आपण प्रामाणिकपणे केल्याचेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी मुख्याध्यापक खानोलकर सर,पर्यवेक्षक प्रभू खानोलकर सर, सौ.गोसावी मॅडम, श्री. वेरलकर सर, श्री, गवळी सर, श्री. साटम सर, श्री. मसुरकर सर, श्री. जाधव सर, श्री. पाटील सर, सौ बांदेकर मॅडम यांनी आपली मनोगते सादर केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.चंद्रशेखर बर्वे तर उपस्थित सर्वांचे आभार श्री.रमेश जाधव यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अस्मिता रावराणे यांनी केले. श्री मणेरीकर सरांचा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री.रमण पाटील यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. मानवता विकास परिषद मुंबईचे अध्यक्ष श्रीकांत सावंत आणि श्री.राजन कामत यांनी पुष्पगुच्छ देऊन सरांचा सत्कार केला .माजी विद्यार्थिनी व माजी नगरसेविका निना मुंबरकर यांनीही सरांचा यथोचित सत्कार केला.

'टोपीवाला हायस्कूलचा शिक्षकी दासबोध हा अखंडच आहे. परंतु जेंव्हा अशी सेवाभावी व विवेकी पाने सेवानिवृत्त होतात तेंव्हा आजी व माजी विद्यार्थीही भावनाविवश होतात', अशी प्रतिक्रिया या सेवानिवृत्ती सत्कारानंतर टोपीवाला हायस्कूलच्या काही माजी विद्यार्थ्यांनी दिली आहे.

error: Content is protected !!