चिंदर | विवेक परब :
जागतिक पर्यावरण दिना निमित्त नागपूर येथील “मृदगंध साहित्य चळवळ” आयोजित पर्यावरण विषयक निसर्ग कवितांच्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून जनता विद्या मंदिर त्रिंबकचे मराठी विषयाचे शिक्षक श्री. एकनाथ गायकवाड यांच्या “ओटि” या आनंदकंद वृत्ता मधील कवितेला उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे. रोख रक्कम व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या गायकवाड यांच्या या यशा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.