27.2 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी ह्यांचे राजापूर नगरीत भव्यदिव्य स्वागत….!

- Advertisement -
- Advertisement -

मंत्रीपदाच्या लाल दिव्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांचे प्रेम आणि
विश्वास हीच आपली खरी संपत्ती…!

रत्नागिरी | ब्यूरो न्यूज : राज्यामध्ये चालू असलेल्या राजकीय घडामोडी मध्ये राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी ह्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि शिवसेना संघटनेसोबत कायम राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेचे राजापूर तालुक्यातील सेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी जोरदार स्वागत करताना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासह शिवसेना संघटनेप्रती निष्ठेचा साऱ्यांसमोर आदर्श घालून दिल्याच्या शब्दामध्ये कौतुक केले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी, ढोल-ताशाचा गजरामध्ये स्वागत करताना ‘शिवसेना झिंदाबाद’ – ‘राजन साळवी आगे बढो अशा जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विकासकामांसाठी कोट्यावधी रूपयांचा निधी दिली आहे. त्यांच्याशी आपले जवळचे संबंध असल्याने अनेकांना मी त्यांच्यासोबत गुवाहाटीला जाईन असा संशय होता. मात्र, आपण कधीच नॉटरिचेबल नव्हतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आपण कट्टर शिवसैनिक असून शिवसेना संघटनेसह पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रती असलेली निष्ठा आणि सर्वसामान्य शिवसैनिकांचे प्रेम अन् विश्वासामुळे आपण संघटनेशी ठाम राहीलो आणि आहोत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आपण कट्टर शिवसैनिक असून त्याचा आपणाला अभिमान आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेनाप्रमुख आदीत्यजी ठाकरे यांच्यासह सर्वसामान्य शिवसैनिकांचे मिळणारे प्रेम हे आपले सौभाग्य आहे. मंत्रीपदाच्या लाल दिव्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांचे प्रेम आणि विश्वास हीच आपली खरी संपत्ती आहे. कितीही घडामोडी झाल्या तरी, रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून भविष्यातही कायम राहील असा विश्वास आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे दिला आहे.” अशी भूमिका राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी ह्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केली.
शिवसेनेसह राज्याच्या मंत्रीमंडळामध्ये राजकीय घडामोडी घडत असताना राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी शिवसेनेच्या अन्य आमदारांसह जाण्याऐवजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासमवेत राहीले आहेत. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत असलेले राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी राजापूर मतदारसंघामध्ये दाखल झाले आहेत. शहरातील मातोश्री मंगल कार्यालयामध्ये झालेल्या सभेमध्ये तालुक्यातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. यावेळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांसह आजी माजी लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या विविध सेलचे पदाधिकारी आणि मोठ्यासंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
माजी जिल्हाप्रमुख तथा सह संपर्कप्रमुख राजेंद्रजी महाडीक यांनी बोलताना सर्वसामान्य शिवसैनिक, जिल्हाप्रमुख ते आमदार असा प्रवास करणारे आमदार डॉ. राजन साळवी यांनी वेळोवेळी कृतीद्वारे संघटनेप्रती दाखवून दिलेली निष्ठा निश्चितच कौतुकास्पद आहे. कितीही घडामोडी घडल्या तरी, जिल्ह्यामध्ये शिवसेना मजबूत राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी जगदीश राजापकर, पांडुरंग उपळकर, प्रकाश कुवळेकर, तात्या सरवणकर, शरद लिंगायत, दुर्वा तावडे आदींनी मनोगते व्यक्त करताना आमदार डॉ. राजन साळवी यांच्या भूमिका आणि निर्णयाचे कौतुक केले. आमदार डॉ. राजन साळवी यांनी आपल्या कृतीतून राजापूर मतदारसंघासह येथील शिवसेनेची मान ताठ ठेवल्याच्या शब्दामध्ये कौतुक केले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणूकांमध्ये घवघवीत यश मिळवून शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवित शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे हात अधिक बळकट करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी तालुका शिवसेनेच्यावतीने राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी ह्यांचे पुष्पहार घालून स्वागत अन सत्कार करण्यात आला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मंत्रीपदाच्या लाल दिव्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांचे प्रेम आणि
विश्वास हीच आपली खरी संपत्ती…!

रत्नागिरी | ब्यूरो न्यूज : राज्यामध्ये चालू असलेल्या राजकीय घडामोडी मध्ये राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी ह्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि शिवसेना संघटनेसोबत कायम राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेचे राजापूर तालुक्यातील सेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी जोरदार स्वागत करताना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासह शिवसेना संघटनेप्रती निष्ठेचा साऱ्यांसमोर आदर्श घालून दिल्याच्या शब्दामध्ये कौतुक केले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी, ढोल-ताशाचा गजरामध्ये स्वागत करताना 'शिवसेना झिंदाबाद' - 'राजन साळवी आगे बढो अशा जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विकासकामांसाठी कोट्यावधी रूपयांचा निधी दिली आहे. त्यांच्याशी आपले जवळचे संबंध असल्याने अनेकांना मी त्यांच्यासोबत गुवाहाटीला जाईन असा संशय होता. मात्र, आपण कधीच नॉटरिचेबल नव्हतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आपण कट्टर शिवसैनिक असून शिवसेना संघटनेसह पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रती असलेली निष्ठा आणि सर्वसामान्य शिवसैनिकांचे प्रेम अन् विश्वासामुळे आपण संघटनेशी ठाम राहीलो आणि आहोत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आपण कट्टर शिवसैनिक असून त्याचा आपणाला अभिमान आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेनाप्रमुख आदीत्यजी ठाकरे यांच्यासह सर्वसामान्य शिवसैनिकांचे मिळणारे प्रेम हे आपले सौभाग्य आहे. मंत्रीपदाच्या लाल दिव्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांचे प्रेम आणि विश्वास हीच आपली खरी संपत्ती आहे. कितीही घडामोडी झाल्या तरी, रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून भविष्यातही कायम राहील असा विश्वास आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे दिला आहे." अशी भूमिका राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी ह्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केली.
शिवसेनेसह राज्याच्या मंत्रीमंडळामध्ये राजकीय घडामोडी घडत असताना राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी शिवसेनेच्या अन्य आमदारांसह जाण्याऐवजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासमवेत राहीले आहेत. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत असलेले राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी राजापूर मतदारसंघामध्ये दाखल झाले आहेत. शहरातील मातोश्री मंगल कार्यालयामध्ये झालेल्या सभेमध्ये तालुक्यातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. यावेळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांसह आजी माजी लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या विविध सेलचे पदाधिकारी आणि मोठ्यासंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
माजी जिल्हाप्रमुख तथा सह संपर्कप्रमुख राजेंद्रजी महाडीक यांनी बोलताना सर्वसामान्य शिवसैनिक, जिल्हाप्रमुख ते आमदार असा प्रवास करणारे आमदार डॉ. राजन साळवी यांनी वेळोवेळी कृतीद्वारे संघटनेप्रती दाखवून दिलेली निष्ठा निश्चितच कौतुकास्पद आहे. कितीही घडामोडी घडल्या तरी, जिल्ह्यामध्ये शिवसेना मजबूत राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी जगदीश राजापकर, पांडुरंग उपळकर, प्रकाश कुवळेकर, तात्या सरवणकर, शरद लिंगायत, दुर्वा तावडे आदींनी मनोगते व्यक्त करताना आमदार डॉ. राजन साळवी यांच्या भूमिका आणि निर्णयाचे कौतुक केले. आमदार डॉ. राजन साळवी यांनी आपल्या कृतीतून राजापूर मतदारसंघासह येथील शिवसेनेची मान ताठ ठेवल्याच्या शब्दामध्ये कौतुक केले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणूकांमध्ये घवघवीत यश मिळवून शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवित शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे हात अधिक बळकट करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी तालुका शिवसेनेच्यावतीने राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी ह्यांचे पुष्पहार घालून स्वागत अन सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!