27.2 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

चिंदर येथील सर्पमित्र स्वप्निल गोसावी यांनी आडवली येथे चार फुट नागाला पकडून सोडले नैसर्गिक अधिवासात…….!

- Advertisement -
- Advertisement -

चिंदर/ विवेक परब :
आडवली भटवाडी तालुका मालवण येथील हरेष चव्हाण यांच्या शेत मांगरात कोंबड्यां खाण्याच्या शोधात सुमारे चार फुट लांब नाग Spectacled cobra, आज दुपारी १२ वाजता घुसला होता. या नागाला चिंदर सडेवाडी, येथील सर्पमित्र स्वप्निल सुर्यकांत गोसावी यांनी इजा न करता, सुखरुप नैसर्गिक अधिवासात सोडले.
सिंधुदुर्ग सर्पमित्र संघटणेचे हे निस्वार्थ, समाज कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे. स्वप्नील गोसावी हे गेली तीन वर्षे ही समाजसेवा, अगदी मोफत करत आहे. या सेवेचा मोबदलाही शासना कडुन मिळत नसतो. स्व:ताचा जिव धोक्यात घालुन फक्त प्राण्यांना वाचवणे, त्यांचे संवर्धन करणे, रक्षण करणे केवळ हाच उदात्त हेतु ठेऊन स्वप्नील गोसावीं सारखे सर्प मित्र किंवा प्राणी मित्र आज, अधोगतीकडे जाणार्‍या निसर्गाचे संवर्धन करत आहेत. आज जिवन जगने किती कठीण आहे. त्यात राजकारणाचा त्रास. महागाई दिवसें दिवस वाढतच आहे. अशामध्ये या मित्रांना शासनाने चरीतार्थ चालवण्यासाठी मोबदला द्यावा अशी मागणी होत आहे.
आडवली गावचे गांवकर मोहन लाड यांनी यावेळी स्वप्निलचे कौतुक केले. निर्भिडपणे अती विषारी व घातक सर्पाला सहज रित्या पकडुन जखम न करताः पिशवीच्या सहाय्याने हाताळत जंगलात सोडणे हे फक्त एक निसर्गावर प्रेम करणारा प्राणीमित्र किंवा सर्प मित्रच करु शकतो. अशी प्रतिक्रीयाही उपस्थितां मधून आली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

चिंदर/ विवेक परब :
आडवली भटवाडी तालुका मालवण येथील हरेष चव्हाण यांच्या शेत मांगरात कोंबड्यां खाण्याच्या शोधात सुमारे चार फुट लांब नाग Spectacled cobra, आज दुपारी १२ वाजता घुसला होता. या नागाला चिंदर सडेवाडी, येथील सर्पमित्र स्वप्निल सुर्यकांत गोसावी यांनी इजा न करता, सुखरुप नैसर्गिक अधिवासात सोडले.
सिंधुदुर्ग सर्पमित्र संघटणेचे हे निस्वार्थ, समाज कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे. स्वप्नील गोसावी हे गेली तीन वर्षे ही समाजसेवा, अगदी मोफत करत आहे. या सेवेचा मोबदलाही शासना कडुन मिळत नसतो. स्व:ताचा जिव धोक्यात घालुन फक्त प्राण्यांना वाचवणे, त्यांचे संवर्धन करणे, रक्षण करणे केवळ हाच उदात्त हेतु ठेऊन स्वप्नील गोसावीं सारखे सर्प मित्र किंवा प्राणी मित्र आज, अधोगतीकडे जाणार्‍या निसर्गाचे संवर्धन करत आहेत. आज जिवन जगने किती कठीण आहे. त्यात राजकारणाचा त्रास. महागाई दिवसें दिवस वाढतच आहे. अशामध्ये या मित्रांना शासनाने चरीतार्थ चालवण्यासाठी मोबदला द्यावा अशी मागणी होत आहे.
आडवली गावचे गांवकर मोहन लाड यांनी यावेळी स्वप्निलचे कौतुक केले. निर्भिडपणे अती विषारी व घातक सर्पाला सहज रित्या पकडुन जखम न करताः पिशवीच्या सहाय्याने हाताळत जंगलात सोडणे हे फक्त एक निसर्गावर प्रेम करणारा प्राणीमित्र किंवा सर्प मित्रच करु शकतो. अशी प्रतिक्रीयाही उपस्थितां मधून आली.

error: Content is protected !!