27.2 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

बाळशास्त्री जांभेकरांच्या नावे कोकणात पत्रकारिता विद्यापिठ व्हावे: नारायण पांचाळ यांचे प्रतिपादन..!

- Advertisement -
- Advertisement -

शिरगाव | संतोष साळसकर :
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे सिंधुदुर्गात पत्रकारिता विद्यापिठ सुरू व्हावे, यासाठी शासनाकडे, आम्हीं सातत्याने पाठपुरावा करत आहोत. यामुळे पत्रकार हा पत्रकारीतेत परिपुर्ण होईल याची खात्री आहे. अशी आग्रही भूमिका, जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडवली येथील पत्रकारांच्या सभेत मांडली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले हे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मगाव असून, या ठिकाणी पत्रकार व पत्रकारितेत आवड असणारे मोठ्या संख्येने भेटी देत असतात, मराठी पत्रकारांसाठी पोंभुर्ले हे प्रेरणा स्थान आहे, पत्रकारितेमध्ये अत्याधुनिक व कायदेविषयक ज्ञान व माहिती मिळावी. मराठी पत्रकारिता उज्वल व्हावी यासाठी सरकारने पत्रकारिता विद्यापीठ सुरू करावे त्यास बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे अशी आपली मागणी असून त्याचा पाठपुरावा सरकारकडे केला जात आहे. आमच्या संघटनेच्या माध्यमातून तो यापुढेही सुरू राहील असा विश्वास मा.नारायण पांचाळ यांनी यावेळी व्यक्त केला.
हे विद्यापीठ कोकणात झाले पाहिजे, या विद्यापीठामुळे पत्रकारांना पत्रकारितेतील परीपुर्ण शिक्षण व कायदेविषयक ज्ञान मिळेल. असे पत्रकारांच्या उज्वल भवितव्याचे विचार, जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष पत्रकार मा.नारायण पांचाळ यांनी आडवली येथे मांडले.
पत्रकारांच्या भवितव्याचा विचार शासनाने करणे गरजेचे आहे. बातमीच्या शोधात असलेला हा वार्ताहर देहभान विसरुन, जीव धोक्यात घालून, पदरमोडीने, योग्य मोल न मिळताही बातमीसाठी वण वण फिरत असतो. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ व संविधान मान्य असलेला, लेखणी द्वारे समाज प्रबोधन व विकास करणारा पत्रकार आजही उपेक्षीत राहिला आहे. न्याय प्रविष्ट असलेल्या त्यांच्या रास्त मागण्याचा शासनाने कधीही विचार केलेला नाही. शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील पत्रकारांना अजूनही मिळत नाही, अधिस्वीकृती पत्रिका मिळण्याचे नियम, पेन्शन योजनेतील अटीं नियम शिथिल झाले तर अनेक गरजूंना त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणुनच पत्रकाराला योग्य न्याय मिळवुन देण्यासाठी कामगार कायद्यानुसार २००४ साली जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र हि संघटना स्थापन होऊन, आज राज्यात पत्रकारांच्या हक्कासाठी कार्यरत आहे. सिंधुदुर्गात संघटनेचे सभासदाना मार्गदर्शन व्हावे म्हणुन आडवली येथे सभा आयोजित केली होती, या वेळी जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्राचे प्रदेश सचिव व सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख, ठाणे येथील साप्ताहिक निर्भय शासनचे संपादक पत्रकार सतिश साटम, यांनी पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन केले. आडवली आधार चारीटेबल ट्रस्टचे संस्थापक अरुण लाड, आडवली माजी उपसरपंच विनोद साटम, सामाजिक कार्यकर्ता अरविंद साटम, श्री. कुवळेकर, श्री पांचाळ, चाफेड सरपंच संतोष साळस्कर, व पत्रकार मित्र ऊपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!