शिरगाव |संतोष साळसकर :
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर यांची तर सचिवपदी देवयानी वरसकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज ओरोस येथे संपन्न झाली. यावेळी नवीन जिल्हा कार्यकारणीची पुढील दोन वर्षासाठी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यात अध्यक्ष पदी उमेश तोरसकर,सचिव – देवयानी वरसकर, उपाध्यक्ष अनुक्रमे – रमेश जोगळे,बंटी केनवडेकर,दाजी नाईक, बाळा खडपकर, खजिनदार – संतोष सावंत, सहखजिनदार – महेश रावराणे, सदस्य अनुक्रमे – दिपेश परब, लखु खरवतकर, प्रकाश काळे,महेश सरनाईक, हरिश्चंद्र पवार, राजेंद्र मुंबरकर, संतोष राऊळ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष गणेश जेठे, माजी अध्यक्ष संतोष वायंगणकर,पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, नंदकिशोर महाजन,संतोष सावंत,मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर, इतर पदाधिकारी आणि सर्व तालुक्यांचे अध्यक्ष,पत्रकार,कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वसंत केसरकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अशोक करंबळेकर यांनी काम पाहिले. विविध विषयावर हसतखेळत ही जिल्हा पत्रकार संघाची निवड शांततेत पार पडली.यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी सर्व नुतन कार्यकारणी चे सर्वांनी विशेष अभिनंदन केले.