उद्या भरडावर होणार जंगी स्वागत..
तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली माहिती व जास्तीतजास्त शिवसैनिक व शिवसेनाप्रेमींना उपस्थित रहायचे केले आवाहन..
मालवण | सहिष्णू पंडित : महाराष्ट्र राज्यातील शिवसेना पक्षात गेले आठवडाभर अस्थिरता यायची शक्यता वाटणारे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान शिवसेनेत बंडखोरी करत काही आमदारांनी वेगळा गटही केला. याच सर्व परिस्थितीत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य काही शाश्वत शिवसेना आमदार व सर्व नेतेमंडळी शिवसेना पक्षासोबत ठाम राहिले आहेत.

कोणत्याही आमिष व प्रलोभनाला यांना बळी न पडणारे निष्ठावंत आमदार वैभव नाईक अशी एक वेगळी नवीन ओळख घेऊन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक हे उद्या रविवारी सकाळी मालवण दौऱ्यावर येत आहेत.
या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी १० : ३० वाजता मालवण भरड नाका येथे आमदार नाईक यांचे मालवण शिवसेनेच्या वतीने जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर मालवण शिवसेना शाखा येथे बैठक होणार आहे. त्यावेळी आमदार वैभव नाईक मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली आहे. यावेळी शिवसेना आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी शिवसेना प्रेमी व शिवसैनिक यांनीही उपस्थित राहावे असे आवाहन हरी खोबरेकर यांनी केले आहे.