25.6 C
Mālvan
Monday, April 7, 2025
IMG-20240531-WA0007

आजगांव येथील कु. वैष्णवी प्रभू हीने पटकावला ‘संगीत विशारद’ हा किताब..!!

- Advertisement -
- Advertisement -

सावंतवाडीची सुकन्या कु. वैष्णवी दत्तप्रसाद प्रभू हीने संगीत क्षेत्रातील मानाची ‘संगीत विशारद’ पदवी प्राप्त करत संगीत क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा टप्पा गाठला..!!

सावंतवाडी । देवेंद्र गावडे
रविवार । दि. ५ जून २०२२

याविषयीचे सविस्तर वृत्त असे कि
संगीत अलंकार सौ. वीणा दळवी मॅडम संचलित ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ या संगीत विद्यालयाची “संगीत विशारद” होण्याचा मान मिळवणारी कु. वैष्णवी प्रभू ही पहिली विद्यार्थीनी ठरली आहे.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयामार्फत घेण्यात आलेल्या नोव्हेंबर २०२१ च्या परीक्षेत ‘शास्त्रीय गायन’ विषयातून तिने हे सुयश संपादीत केले आहे.

कु. वैष्णवी प्रभू ही आजगांव सारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. घरात संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नसताना अतिशय लहान वयात, म्हणजेच वयाच्या अठराव्या वर्षी संगीत अलंकार सौ. वीणा दळवी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हे पदवी मिळविली आहे. ही बाब अत्यंत कौतुकास्पद तर आहेच पण ग्रामीण भागातील संगीत क्षेत्राची आवड असणा-या मुलांना अत्यंत प्रेरणादायी देखील आहे.

कु. वैष्णवी ही सावंतवाडी येथील पंचम खेमराज महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिकत आहे.

अतिशय कमी वयात तीने प्राप्त केलेल्या या दैदिप्यमान यशाबद्धल तीच्यावर शिक्षक, कर्मचारीवृंद, विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच संगीत क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्वच स्तरांमधून तीचं कौतुक होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सावंतवाडीची सुकन्या कु. वैष्णवी दत्तप्रसाद प्रभू हीने संगीत क्षेत्रातील मानाची 'संगीत विशारद' पदवी प्राप्त करत संगीत क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा टप्पा गाठला..!!

सावंतवाडी । देवेंद्र गावडे
रविवार । दि. ५ जून २०२२

याविषयीचे सविस्तर वृत्त असे कि
संगीत अलंकार सौ. वीणा दळवी मॅडम संचलित 'श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग' या संगीत विद्यालयाची "संगीत विशारद" होण्याचा मान मिळवणारी कु. वैष्णवी प्रभू ही पहिली विद्यार्थीनी ठरली आहे.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयामार्फत घेण्यात आलेल्या नोव्हेंबर २०२१ च्या परीक्षेत 'शास्त्रीय गायन' विषयातून तिने हे सुयश संपादीत केले आहे.

कु. वैष्णवी प्रभू ही आजगांव सारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. घरात संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नसताना अतिशय लहान वयात, म्हणजेच वयाच्या अठराव्या वर्षी संगीत अलंकार सौ. वीणा दळवी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हे पदवी मिळविली आहे. ही बाब अत्यंत कौतुकास्पद तर आहेच पण ग्रामीण भागातील संगीत क्षेत्राची आवड असणा-या मुलांना अत्यंत प्रेरणादायी देखील आहे.

कु. वैष्णवी ही सावंतवाडी येथील पंचम खेमराज महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिकत आहे.

अतिशय कमी वयात तीने प्राप्त केलेल्या या दैदिप्यमान यशाबद्धल तीच्यावर शिक्षक, कर्मचारीवृंद, विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच संगीत क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्वच स्तरांमधून तीचं कौतुक होत आहे.

error: Content is protected !!