भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते नियुक्तीपत्र देत भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी निवडी केल्या जाहीर..!
वैभववाडी/विवेक मालवणकर- वैभववाडीत आमदार नितेश राणे साहेब यांच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांना लक्ष केंद्रित करत शिवसेना पक्षातील असंख्य कार्यकर्ते भाजप पक्षात आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करीत आहेत. त्यातच भटके-विमुक्त आघाडीतील धनगर समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात या दोन दिवसात प्रवेश केले .त्यात वैभववाडी तालुक्याचे माजी सभापती अंबाजी हुंबे यांच्यासह असंख्य समाजबांधवांनी प्रवेश केला होता. तसेच आज देखील मधुकर विठोबा कोकरे यांच्या सहित अनेक समाज बांधवांनी पक्ष प्रवेश केला या दोघांचाही पक्षप्रवेश पक्ष संघटना बांधणीसाठी महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे माजी सभापती पंचायत समिती वैभववाडी तथा कुर्ली गावचे विद्यमान उप सरपंच अंबाजी हुंबे यांची भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीच्या जिल्हा प्रमुख सल्लागार पदी तर प्रकाश विकास सोसायटी कुर्लीचे विद्यमान संचालक मधुकर कोकरे यांची वैभववाडी तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी निवडी केल्या जाहीर.
यावेळी भाजप आमदार नितेश राणे, भारतीय जनता पार्टी वैभववाडी तालुका अध्यक्ष नासीर काझी, वाभवे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नेहा माईनकर, जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे, अरविंद रावराणे,जयेंद्र रावराणे, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी नवलराज काळे, माजी सभापती अंबाजी हुंबे, बाबा कोकाटे, वैभववाडी तालुका भटके-विमुक्त आघाडीचे युवा अध्यक्ष सूर्यकांत बोडके,नानिवडेकर मॅडम, महिला जिल्हा सरचिटणीस स्नेहलता चोरगे,शुभांगी पवार, महिला वैभववाडी तालुका अध्यक्ष प्राची तावडे, नगरपंचायत बांधकाम सभापती विवेक रावराणे, आरोग्य शिक्षण व सांस्कृतिक सभापती रेवा बावदाने, नगरसेविका संगीता चव्हाण, नगरसेविका सुप्रिया तांबे, नगरसेवक रोहन रावराणे, युवा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, खांबाळे पंचायत समिती शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश पाटील, लोरे पंचायत समिती शक्ती केंद्र प्रमुख रितेश सुतार, कोकिसरे शक्ती केंद्रप्रमुख प्रदीप नारकर, कुर्ली गावचे ग्रामपंचायत सदस्य सूरज तावडे, प्रकाश विकास सोसायटी कुर्ली चे विद्यमान संचालक मधुकर कोकरे,भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी कार्यकर्ते व धनगर समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.