संत्रस्त नागरिकांतर्फे अॕड संग्राम गावडे यांचा नगरपालिकेत न्यायासाठी तक्रारअर्ज दाखल !
सावंतवाडी | सहिष्णू पंडित सावंतवाडी शहरातील मूळ बाजारपेठ समजली जाणा-या इंदिरा गांधी संकुलातील व्यापारी आपले गाळे सोडून रस्त्यावर विक्रीसाठी उतरत असून रहदारीस अडथळा निर्माण करत आहेत.हे अतिक्रमण बेकायदेशीर असल्याचे तक्रारदार अॕड.संग्राम गावडे यांनी नागरिकांच्या वतीने दिलेल्या तक्रारअर्जात म्हटले आहे. सदरच्या बेकायदा अतिक्रमणामुळे नागरिकांना चालताना त्रास होतो, गाड्यांचे पार्कींग जागा मिळेल तेथे रस्त्यावर करावे लागते, ट्राफीक जाम होतो अशा अनेक अडचणींना त्रस्त सावंतवाडीकर तोंड देत आहेत आणि म्हणूनच एक जागरूक नागरिक या भूमिकेतून अॕड.संग्राम गावडे यांनी सावंतवाडी नगरपालिकेत संकुलातील व्यापा-यांच्या उपद्रवी अतिक्रमाणाविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे.