चालक मंद्य धुंदी अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती..
चिंदर | विवेक परब—
कणकवली आचरा मार्गावर रात्री 9च्या दरम्यान चिंदर बाजार परिसरात एका खाजगी ट्रँव्हल्सने काही पादच-यांन सह रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिली. या अपघातात एका रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातात महाविर आरोलकर. रा.कुडाळ- वय वर्षे 61, दर्शना भोळे, रत्नागिरी-वय वर्षे 62 किरकोळ तर रोहित तर्फे रा. त्रिंबक-वय वर्षे 24 हा जखमी गंभीर असून त्याला अधिक उपचारासाठी कणकवली येथे हलवण्यात आले आहे. अधिक तपास आचरा पोलिस स्टेशनचे ए. पी. आय कुलदिप पाटील करत आहेत.