26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

‘युवा चॅलेंजर…! (साप्ताहिक सदर) भाग सातवा . ‘करेक्ट कार्यक्रम.’

- Advertisement -
- Advertisement -

लेखन : रोशन चिंचवलकर .( पळसंब,सिंधुदुर्ग)

एप्रिल, मे, गणपती, होळी हे सण म्हटले की कोकणात गाजावाजा असतो. सगळे वातावरण
भारावून टाकणारे असते. शहराच्या निरनिराळ्या भागात राहणारी,कधी तरी मंडळाच्या सभेत दिसणारे चेहरे गावात दिसू लागतात . ते दिवस तसे बऱ्याच जणांच्या आयुष्यातील अविस्मरणीय अशा काळातील असतात.
परतीला येताना पाय निघत नसतो. पोट, रोजगार, आर्थिक स्थैर्य यांचा प्रश्न तेवढाच मोठा असतो की आपण ह्या स्वर्गातून का जातोय याचे उत्तर कोणाकडेच नसते.
जड अंतःकरण करत उचललेली कपड्याची बॅग, दिलेली भेट तेवढीच जड वाटते. 10 ते 15 दिवस गजबजलेली गावे, वाड्या पुन्हा शांत होतात. कोकणातील बऱ्याच गावांत हीच स्थिती आढळून येते .

ही सर्व परिस्थिती सांगायचे कारणं म्हणजे एवढया मोठ्या प्रमाणात कार्यक्रम, उत्सव राबवणाऱ्या गावांचा रोजगार, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण याविषयी आखणी किंवा नियोजनात्मक कार्यक्रम जिल्ह्यातील गावात वाड्यावाड्यांवर चालताना दिसतं नाहीय. कोणाचा वैयक्तिक लग्नाचा, बारशाचा, गृह प्रवेशाचा कार्यक्रम सोडला तर गावपातळीवर पौराणिक नाटकं, दहीकाले, तमाशा, डबलबारी, सत्यनारायण, देवस्थानाची वार्षिकं असे अनेक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात.असे कार्यक्रम होणं आवश्यकच आहे. मनोरंजन, गरजेचे आहे, संस्कृती देखील टिकली पाहिजेच.
त्यासोबत व्यवसाय, शेती, आरोग्य, सामाजिक प्रश्न याबाबत गावात गांभीर्य ठेऊन आयोजित केलेले कार्यक्रम दुर्मिळ आहेत.
हा विषय गहन आहे.
आरोग्याचे म्हणले तर कोकणात सर्वत्र उपलब्ध अशा आरोग्य सुविधा उत्तम पुरेशा नाहीत. एखादा रुग्ण भरपूर गंभीर असेल तर मुंबई,पुणे,मिरज,बेळगांव कोल्हापूर किंवा गोव्याशिवाय पर्याय नाही.
विषय राजकीय आणि सामाजिक प्रश्नांचा असेल तर कोकणात त्यावर फारसे भाष्य होत नाही.
असे मूलभूत प्रश्न व गरजा देखील आहेत हे बहुतांश जणांना माहिती असतं. रोजगाराची देखील हीच परिस्थिती आहे. तसे प्रबोधन करणारे कार्यक्रम कोकणात होणे आवश्यक आहे.
कोकणातील गावात ग्रामदैवताचं देऊळ हे नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहे. गावात ग्रामसभेला जेवढी माणसे जमत नाहीत त्याच्या कित्येक पटीने ग्रामस्थ देवस्थानाच्या कार्यक्रमाला असतात. तिथेच जर रोजगार, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पर्यटन या विषयांना प्रोत्साहन मिळाले तर अख्या जिल्ह्यावर देवाची कृपा वाढेल.
स्थानिक पातळीवर रोजगाराचा प्रश्न देशभरात आहे तसा तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आहे. परंतु, जिल्हा सुरुवातीला लाखो रोजगार उपलब्ध जरी करू नाही शकला तरी हजारो रोजगार तरी नक्कीच तयार होतील.
जेवढे जास्त गावकरी इथे स्थिरावतील तेवढ्याच इथल्या अंगणवाड्या, शाळा, मैदाने, देवळं सारे काही गजबजून जाईल… एका नव्या उर्जेसह…! गरज आहे ती दृष्टीकोनाची आणि अचूक तथा ‘करेक्ट कार्यक्रमाची.’

तर घेताय ना हे सात्विक चॅलेंज व बनताय ना युवा चॅलेंजर…!

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

लेखन : रोशन चिंचवलकर .( पळसंब,सिंधुदुर्ग)

एप्रिल, मे, गणपती, होळी हे सण म्हटले की कोकणात गाजावाजा असतो. सगळे वातावरण
भारावून टाकणारे असते. शहराच्या निरनिराळ्या भागात राहणारी,कधी तरी मंडळाच्या सभेत दिसणारे चेहरे गावात दिसू लागतात . ते दिवस तसे बऱ्याच जणांच्या आयुष्यातील अविस्मरणीय अशा काळातील असतात.
परतीला येताना पाय निघत नसतो. पोट, रोजगार, आर्थिक स्थैर्य यांचा प्रश्न तेवढाच मोठा असतो की आपण ह्या स्वर्गातून का जातोय याचे उत्तर कोणाकडेच नसते.
जड अंतःकरण करत उचललेली कपड्याची बॅग, दिलेली भेट तेवढीच जड वाटते. 10 ते 15 दिवस गजबजलेली गावे, वाड्या पुन्हा शांत होतात. कोकणातील बऱ्याच गावांत हीच स्थिती आढळून येते .

ही सर्व परिस्थिती सांगायचे कारणं म्हणजे एवढया मोठ्या प्रमाणात कार्यक्रम, उत्सव राबवणाऱ्या गावांचा रोजगार, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण याविषयी आखणी किंवा नियोजनात्मक कार्यक्रम जिल्ह्यातील गावात वाड्यावाड्यांवर चालताना दिसतं नाहीय. कोणाचा वैयक्तिक लग्नाचा, बारशाचा, गृह प्रवेशाचा कार्यक्रम सोडला तर गावपातळीवर पौराणिक नाटकं, दहीकाले, तमाशा, डबलबारी, सत्यनारायण, देवस्थानाची वार्षिकं असे अनेक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात.असे कार्यक्रम होणं आवश्यकच आहे. मनोरंजन, गरजेचे आहे, संस्कृती देखील टिकली पाहिजेच.
त्यासोबत व्यवसाय, शेती, आरोग्य, सामाजिक प्रश्न याबाबत गावात गांभीर्य ठेऊन आयोजित केलेले कार्यक्रम दुर्मिळ आहेत.
हा विषय गहन आहे.
आरोग्याचे म्हणले तर कोकणात सर्वत्र उपलब्ध अशा आरोग्य सुविधा उत्तम पुरेशा नाहीत. एखादा रुग्ण भरपूर गंभीर असेल तर मुंबई,पुणे,मिरज,बेळगांव कोल्हापूर किंवा गोव्याशिवाय पर्याय नाही.
विषय राजकीय आणि सामाजिक प्रश्नांचा असेल तर कोकणात त्यावर फारसे भाष्य होत नाही.
असे मूलभूत प्रश्न व गरजा देखील आहेत हे बहुतांश जणांना माहिती असतं. रोजगाराची देखील हीच परिस्थिती आहे. तसे प्रबोधन करणारे कार्यक्रम कोकणात होणे आवश्यक आहे.
कोकणातील गावात ग्रामदैवताचं देऊळ हे नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहे. गावात ग्रामसभेला जेवढी माणसे जमत नाहीत त्याच्या कित्येक पटीने ग्रामस्थ देवस्थानाच्या कार्यक्रमाला असतात. तिथेच जर रोजगार, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पर्यटन या विषयांना प्रोत्साहन मिळाले तर अख्या जिल्ह्यावर देवाची कृपा वाढेल.
स्थानिक पातळीवर रोजगाराचा प्रश्न देशभरात आहे तसा तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आहे. परंतु, जिल्हा सुरुवातीला लाखो रोजगार उपलब्ध जरी करू नाही शकला तरी हजारो रोजगार तरी नक्कीच तयार होतील.
जेवढे जास्त गावकरी इथे स्थिरावतील तेवढ्याच इथल्या अंगणवाड्या, शाळा, मैदाने, देवळं सारे काही गजबजून जाईल… एका नव्या उर्जेसह…! गरज आहे ती दृष्टीकोनाची आणि अचूक तथा 'करेक्ट कार्यक्रमाची.'

तर घेताय ना हे सात्विक चॅलेंज व बनताय ना युवा चॅलेंजर…!

error: Content is protected !!