28.6 C
Mālvan
Tuesday, December 3, 2024
IMG-20240531-WA0007

कणकवली शहराला पाणीटंचाईची भेडसावणारी समस्या सुटणार : नगराध्यक्ष समीर नलावडे

- Advertisement -
- Advertisement -

उद्या दुपारपर्यंत शिवडाव धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही केली जाणार..!

कणकवली | बंटी राणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहराला भेडसावणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी आज तातडीने यासंदर्भात कार्यवाही केली. काल जलसंपदा विभागाला मुख्याधिकार्‍यांनी पत्र व्यवहार केल्यानंतर नगराध्यक्षांनी देखील या विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. आज जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता महादेव कदम यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी भेट घेत नगरपंचायतमध्ये चर्चा केली . या भेटीदरम्यान शिवडाव धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी करण्यात आली. त्यावर कणकवली नगरपंचायत कडून 2016- 2017 मधील 2 लाख 4 हजार 700 रुपये पाणीपट्टी येणे बाकी असल्याने ती भरणा करण्याची मागणी विभागाकडून करण्यात आली.त्यावर ही रक्कम तातडीने भरणा करण्यात येईल असे नगराध्यक्ष श्री नलावडे यांच्याकडून सांगण्यात आले. अशा सूचना देखील संबंधितांना देण्यात आल्या. त्यावर उद्या दुपारपर्यंत शिवडाव धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही केली जाईल असे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिल्याची माहिती नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी दिली. शिवडाव धरणाचे पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे येत्या पावसाळ्यापर्यंत कणकवली शहराला पाणीटंचाईची भेडसावणारी समस्या सुटणार आहे. यावेळी उप अभियंता महेश हिरेगोदार उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

उद्या दुपारपर्यंत शिवडाव धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही केली जाणार..!

कणकवली | बंटी राणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहराला भेडसावणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी आज तातडीने यासंदर्भात कार्यवाही केली. काल जलसंपदा विभागाला मुख्याधिकार्‍यांनी पत्र व्यवहार केल्यानंतर नगराध्यक्षांनी देखील या विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. आज जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता महादेव कदम यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी भेट घेत नगरपंचायतमध्ये चर्चा केली . या भेटीदरम्यान शिवडाव धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी करण्यात आली. त्यावर कणकवली नगरपंचायत कडून 2016- 2017 मधील 2 लाख 4 हजार 700 रुपये पाणीपट्टी येणे बाकी असल्याने ती भरणा करण्याची मागणी विभागाकडून करण्यात आली.त्यावर ही रक्कम तातडीने भरणा करण्यात येईल असे नगराध्यक्ष श्री नलावडे यांच्याकडून सांगण्यात आले. अशा सूचना देखील संबंधितांना देण्यात आल्या. त्यावर उद्या दुपारपर्यंत शिवडाव धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही केली जाईल असे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिल्याची माहिती नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी दिली. शिवडाव धरणाचे पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे येत्या पावसाळ्यापर्यंत कणकवली शहराला पाणीटंचाईची भेडसावणारी समस्या सुटणार आहे. यावेळी उप अभियंता महेश हिरेगोदार उपस्थित होते.

error: Content is protected !!