‘डान्स वुईथ फुलवा’ नृत्य शिबीर कोकण दौरा 2022 निमित्त रंगीत तालमीसाठी केले विशेष मार्गदर्शन ; नृत्यांगना व ‘फुलवाशिष्या’ अंकिताचीही उपस्थिती.
शिबिरासाठी कोरीओग्राफर सेड्रिक डिसोजांचे विशेष प्रयत्न.
मालवण | सुयोग पंडित : ‘बुगी वुगी सिझन वन’ विजेत्या आणि डान्स इंडिया इंडिया डान्स सुपरमाॅमच्या सुपरहिट नृत्यांगना व आंतरराष्ट्रीय कोरीओग्राफर फुलवा खामकर यांनी मालवण शहराला आज भेट दिली.
मालवणमधील मामा वरेरकर नाट्यगृह येथे ‘डान्स वुईथ फुलवा’ नृत्य शिबिरातील सहभागी छोट्या मुलांच्या रंगीत तालिम तथा मार्गदर्शनासाठी कोरीग्राफर सेड्रिक डिसोजा व ‘फुलवाशिष्या’ अंकिता यांचे मुलांना मार्गदर्शक लाभले.
फुलवा खामकर यांच्यावर पुष्पवृष्टी करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित महिलांनी त्यांचे पारंपारिक पद्धतीने औक्षण करुन स्वागत केले.
यावेळी फुलवा खामकर यांनी उपस्थित पालकांशी व मुलांशी संवाद साधला. प्रत्येक माॅम ही सुपरमाॅम असते. कुठलिही कला सादर करणे हे जीवनाचे व्यक्तता माध्यम असते. जीवनात कोणीच वयाचा विचार करुन कला,क्रिडा व छंदाकडे किंवा प्रतिभेकडे पाहू नये असे फुलवा खामकर यांनी विशेष नमूद केले .
फुलवा या राष्ट्रीय जिम्नॅस्ट देखील असून त्यांना बालपणापासूनच राज्य व राष्ट्रस्तरावर त्या क्षेत्रातही योगदान देत आनंद घेता व देता आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संयम व सचोटी या दोन गोष्टी व्यावसायिक वृत्तीसाठी आवश्यक असून प्रसन्नता ही आयात करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले .
फुलवा खामकर यांचे वडिल अनिल बर्वे व आजोबांच्या प्रसन्नतेचा आदर्श त्यांनी आत्मसात केला आणि तो स्वतःत प्रतिभेच्या माध्यमातून आज फुलत जातोय असे सांगताना त्यांनी बाल मनाला जाणीव संदेश दिला.
विविध क्षेत्रातील पालक,प्रशिक्षक यांच्या दृष्टीकोनाविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. ‘फुलवा खामकर स्कूल ऑफ डान्स व जिम्नॅस्टिक’ या प्रकल्पाबद्दलही त्यांनी माहिती दिली.
मामा वरेरकर नाट्यगृह येथे झालेल्या या नाट्य शिबिराच्या आजच्या रंगीत तालमीला फुलवा खामकर यांच्या सोबत त्यांच्या शिष्या अंकिता व या संपूर्ण शिबिराचे आयोजन तसेच नियोजन यासाठी प्रयत्नशील राहीलेले डान्सर व कोरीओग्राफर सेड्रिक डिसोजा उपस्थित होते.
या शिबिर सत्रामध्ये स्थानिक तथा पालक वर्गातून कविता तारी, पूजा तळाशीलकर, श्रेया गवंडी, संगीता केरकर, दीपा वणकुद्रे आणि इतर नृत्य उत्सुक पालक व बालक बालिका व पत्रकार उपस्थित होते.