आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केला भाजपात प्रवेश…
कणकवली | बंटी राणे : कणकवली तालुक्यातील वागदे येथील आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली तालुक्यातील वागदे गावच्या शिवसेना सरपंच श्रीमती पूजा घाडीगांवकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत श्रीमती तेजस्विनी गावडे, संजना गावडे, समीरा गावडे, स्वरा गावडे, वनिता गावडे,ऐश्वर्या जाधव,इंदिरा गावडे,अनिता गावडे,चंद्रभागा गावडे,श्री. विजय सराफ,सुहास गावडे,लीलाधर गावडे,उमेश घाडीगांवकर,शरद गावडे,गणेश गावडे,रमेश गावडे,गंगाराम घाडीगांवकर, संजय घाडीगांवकर, सूर्यकांत घाडीगांवकर, दीपक घाडीगांवकर, मंगेश जाधव या सर्व शिवसैनिकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. गोट्या सावंत,भाजप तालुका अध्यक्ष श्री. मिलिंद मेस्त्री,शशी राणे,युवा मोर्चा प्रमुख श्री. संदीप मेस्त्री,संदीप सावंत,बाबू घाडीगांवकर, संतोष गावडे, सुभाष मालंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.