मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गडघेरा बाजार पेठ येथील श्री साई मंदिर वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १८ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी बारा वाजता आरती व साई भंडारा, सायंकाळी सात वाजता पालखी मिरवणूक, रात्री आठ वाजता आरती आणि प्रसाद वाटप, रात्री नऊ वाजता २०-२० डबलबारी भजन सामना होणार आहे. भजन सम्राट विजय परब यांचे शिष्य वडची देवी प्रसादिक भजन मंडळ लिंगडाळ देवगड येथील बुवा श्री संदीप लोके यांना पखवाज योगेश सामंत, तबला संदेश सुतार विरुद्ध गुरुवर्य प्रदीप पांचाळ यांचे शिष्य देवी सातेरी प्रसादिक भजन मंडळ पावशी तालुका कुडाळ येथील बुवा अरुण घाडी याना तबला गौरव पिंगुळकर आणि पखवाज विनीत धुरी यांच्या मध्ये होणार आहे.
दिनांक १९ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता आरती व तीर्थ प्रसाद,रात्री सात वाजता साई मंदिर सभोवती पालखी मिरवणूक, रात्री आठ वाजता आरती व तीर्थ प्रसाद, रात्री नऊ वाजता संतोष मसुरकर टोकळवाडी यांचे सुश्राव्य भजन, रात्र साडेनऊ वाजता श्री विठ्ठला देवी दशावतार नाट्य मंडळ राठीवडे यांचा चंड मायाजाळ हा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आव्हान साई भक्त मंडळ मसुरे गडघेरा बाजारपेठ यांनी केले आहे.