बांदा | राकेश परब : जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा बांदा निमजगा येथे नुकतेच बांदा निमजगा व शाळा बांदा सटमठ संयुक्त रित्या शाळेत शाळा पूर्व तयारी अभियान उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.
जि प पूर्ण प्राथमिक शाळा बांदा निमजगा येथे सन २०२२-२३ इयत्ता १ ली दाखल होणार्या विद्यार्थ्यांचां शाळा पूर्व तयारी अभियान उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संदीप बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित बांदा सरपंच मा श्री अक्रम खान सर, ग्रामपंचायत सदस्य मा श्री बाळू सावंत, निमजगा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संदीप बांदेकर , सटमटवाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीक्षा मावळणकर, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर सावंत , श्री शैलेश शेटकर, आनंद देसाई , केंद्र प्रमुख श्री एस डी गवस, सर्व शिक्षा अभियान विषय तज्ञ श्री प्रसाद सांगेलकर, श्री स्वप्निल राहूळ, अंगणवाडी सेविका वर्षा आगलावे, देवयानी डेगवेकर, श्रीमती आमेलकर, श्रीम गावडे, श्रीमती शोभा बांदेकर, चारुशीला परब सर्व बांदा बीट अंगणवाडी ताई, मदतनीस, उपस्थित होते. प्रथम इयत्ता १ ली दाखल होणार्या विद्यार्थ्यांनची प्रभात फेरी काढण्यात आली. त्याप्रमाणे सर्व दाखल पात्र मुलांचे मुख्याध्यापक श्रीमती प्राजक्ता राऊळ, तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मुलांना ओवाळून त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित राहून एकूण अभ्यासक्रम निगडित ७ स्टॉल लावण्यात आले. यामध्ये पुढील शैक्षणिक वर्षातील नवीन पहिलीत येणाऱ्या मुलांचे स्वागत, मुलांची बौद्धिक, शारीरिक आणि इतर क्षमता तपासणी करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक श्रीम प्राजक्ता राऊळ मॅडम केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शरद राऊळ मुख्याध्यापक बांदा सटमठवाडी यांनी केले. तसेच सूत्र संचालन श्रीम सुवर्णा भाईप, व आभार श्रीमती लुईजा गोन्सालवीस यांनी मानले.
श्री मालू लांबर उप शिक्षक, श्रीम मंगल दराडे उप शिक्षिका श्री प्रशांत पवार उप शिक्षक बांदा सटमठवाडी तसेच अंगणवाडी ताई, मदतनीस, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.