29.4 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

जीर्ण झालेल्या पोलिस स्टेशन इमारती लवकरच आधुनिक करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार…!

- Advertisement -
- Advertisement -

आधुनिक शस्त्रास्त्रे, संपर्क यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा व वेगाने धावणाऱ्या गाड्या या साधनांसोबत सुसज्ज करणार स्मार्ट पोलिसिंग व ई-ऑफिस..!

मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासह पोलीस अधिकारी , कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे‌. यासाठी पोलीसांच्या सोयी-सुविधांसाठी जुलै महिन्यातील अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी केले.

शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय , शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने जीर्ण झालेल्या राज्यातील ७५ पोलीस ठाण्याचे बांधकाम करण्यात येईल. तसेच राज्यात पोलीसांच्या विविध गृहनिर्माण कार्यक्रमास ८६० कोटी उपलब्ध करून दिले आहेत. या निधीत पुरवणी मागण्यांद्वारे अधिक वाढ करण्यात येईल. पोलीसांसाठी ५३५ चौरस फुटांच्या साडेसहा हजार सदनिका शासनाने राज्यात उपलब्ध करून दिले आहेत. या बांधकामांच्या दर्जात कुठेही तडजोड करण्यात आली नाही.

पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे, संपर्क यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा व वेगाने धावणाऱ्या गाड्या या सुसज्ज साधनांसोबत स्मार्ट पोलिसिंग व ई-ऑफिसचे काम करण्यात येत आहे. याबरोबरच पोलीस दलाची मान खालावली जाईल असे काम पोलीसांनी करू नये, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार या़नी सांगितले.
गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस दलासोबत इतर विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवून काम करावे. जिल्हा नियोजन मधून पोलीसांना वाहने उपलब्ध करून देण्यात येतील, असेही श्री.पवार यांनी सांगितले.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले , राज्यातील पोलीसांना सुसज्ज घरे मिळाल्यास त्यांच्या कार्यक्षमतेत निश्चित वाढ होणार आहे. राज्यातील पोलीसांना पुढील दोन महिन्यांत ६ हजार ८५३ घरे उपलब्ध करून देण्यात येतील. शासनाने राज्य पोलिस राखीव दलामधील पोलीसांना राज्य पोलिसात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस शिपायास निवृत्तीपर्यंत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पदोन्नती देण्याचाही निर्णय घेतला.
कोरोना काळात पोलीसांनी रस्त्यावर येऊन चोवीस तास काम केले. गृह विभाग पोलीसांना घरे व विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे‌. राज्यात धार्मिक तेढ व अशांतता निर्माण होणार नाही. यासाठी काम करावे, असेही गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी सांगितले.
या इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई यांनी केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात २ महिला पोलीस व १ पुरूष पोलीस अंमलदारास सदनिकेच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे संयोजन अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, कार्यकारी अभियंता सुनिल‌ सांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, हिरालाल पाटील यांनी केले.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील , पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, श्री.साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार किशोर दराडे, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) विवेक फणसळकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस उप महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व्यासपीठावर आदि उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!