ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची जागा केंद्रच ठरवणार असल्याचा नितेश राणेंचा टोला.!
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला बारसु येथे ग्रीन रिफायनरी व्हावी, यासाठी केंद्राला पत्र दिले.त्यामुळे आता बारसु गावात सातबारा तपासणी करुन कोणाच्या जमिनी आहेत हे पाहण्याची वेळ आली आहे.आदित्य ठाकरे व शिवसेनेची आता समर्थन वाढल्याने भूमिका बदलली आहे.आता नाणार नव्हे तर ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार,पण कुठल्या जागेत होणार हे केंद्र सरकार ठरवणार आहे,असा टोला शिवसेनेला भाजपा आमदार नितेश राणे यांनी लगावला.कणकवली येथील ब्रार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेची भूमिका कोणत्याही प्रकल्पाबाबत नेहमी बदलत असते.पहिला विरोध करुन ,लोकांची माथी भडकवून दिशाभूल करायची आहे.मग स्वतःहून पाठींबा देण्यासाठी पुढे यायचं.नानार या ठिकाणी वगळलेली गावं बाजूला करत नवी जागा एकत्र करुन रिफायनरी करावी.यासाठी माजी आ.प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीत मंत्र्यांची भेट घेणार आहोत.विनायक राऊत यांना काडीची किंमत राहिली नाही,असा टोला आ.नितेश राणे यांनी लगावला. जिथे जिथे वाद नाहीत, ते गाव घेऊन ग्रीन रिफायनरी व्हावी,असं आमचं मत आहे.जे काही मुख्यमंत्री यांनी पत्र दिले,त्यावर केंद्र निर्णय घेईल.केंद्रीय मंत्री नारायण राणे व ना. पुरी हे एकत्र निर्णय घेऊन हा प्रकल्प होईल.विरोधात लोक आहेत,त्यांची संख्या कमी आहे. केंद्राच्या माध्यमातून रिफायनरी प्रकल्प होईल.ना.राणेंशी मी सकाळी चर्चा केली आहे.प्रमोद जठार हे पहिल्या दिवशी पासून ते काम करत आहेत.त्यामुळे त्यांना घेऊन आम्ही दिल्लीत जाऊ, त्या दिशेने आम्ही पाऊले टाकतो.मात्र सातबाऱ्यावर बारसु गावात कोणाचे आहेत?ते आम्ही तपासणी करणार असल्याचे आ.नितेश राणे यांनी सांगितले. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दौऱ्यावर आले होते, केवळ टोमने मारुन बोलण्यासाठी आले होते का?पर्यटन मंत्री म्हणून व्यावसायिक लोकांशी बोलले का?दोन वर्षे कोरोना काळ होता.त्यांना दिलासा मत्र्यांनी दिला का? केवळ पक्ष बांधणीसाठी हा प्रवास केला.देवगड मध्ये आदित्य ठाकरे यांचा आवाज आहे कुठे?काहींनी ओरिजनल टायगर म्हणून बॅनर्स लावले. शिवसेना कुठे जिंकली?जिल्हा बँक गेली,ताकद लावून सुद्धा..! कुडाळ, देवगड या दोन ठिकाणी दुसऱ्या लोकांच्या पाठींबा घेऊन सत्ता आहे.मला बाहेर ठेवून जिंकण्यात काय आहे ?मला वाटलं की देवगडची सत्ता बदलणं सोपं आहे.माझ्या संपर्कात अनेक लोक आहेत.त्यामुळे पुढील काळात पाहू कसे करता येईल,असा इशारा शिवसेनेला आ.नितेश राणे यांनी दिला आहे. भाजपाचा रिफायनरी व राजकारण याचा कोणताही संबंध नाही.भाजप वाढविण्यासाठी काय ?ही टीका भास्कर जाधव यांची चुकीची आहे.सिंधू रत्न योजनेच्या माध्यमातून काय करणार?जी कमिटी केली,त्याचे सदस्य कोण असणार आहेत.ही योजना शिवसेनेसाठी केली आहे का?किती पैसे दिले आहेत?असे सवाल नितेश राणे यांनी व्यक्त करतानाच कॉग्रेस मध्ये तरुणांमध्ये किंमत कुठे? मी एकमेव आमदार कोकणातुन निवडून आलो होतो,राहुल गांधी हे आम्हाला केव्हाच भेटले नाहीत.त्यामुळे कॉग्रेसची अवस्था बिकट आहे,असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.